सिमला: देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना सिमल्यातील IGMC हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी सिमल्यात सुट्टीसाठी आलेल्या अशी माहिती समोर येत आहेत.
सुट्टी साजरी करण्यासाठी सोनिया गांधी या सिमल्यात आल्या होत्या. आज दुपारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना सिमल्यातील आयजीएमसी म्हणजेच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
कॉँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या सिमल्यात आल्या होत्या. सिमल्यापासून जवळच असणाऱ्या दुपारी मुलगी प्रियंका गांधी यांच्या घरी थांबल्या होत्या. मात्र शनिवारी दुपारी त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अनेक प्रकरच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.