Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा दिलासा

२०१९, २०२१, २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख व्हेरिफाय केली आहे. आयोगाने माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे आयोगाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2024 | 03:10 PM
बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने दिला 'हा' मोठा दिलासा

बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने दिला 'हा' मोठा दिलासा

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात सध्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.  दरम्यान तिच्यावर बनावट प्रमाणपत्र तयार करून या सेवेत आल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान दिल्ली हायकोर्टात पूजा खेडकरच्या अंतरिम जामिनावर सुनावणी पार पडली. पूजा खेडकर यांच्या वकिलांनी उत्तर दकाहल करण्यासाठी कोर्टाकडे थोडा अधिक कालावधी मागितला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला ४ ऑक्टोबरपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने ४ तारखेपर्यंत उत्तर सादर करण्यास वेळ दिला आहे.

याआधी ५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत एम्समध्ये अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचे पूजा खेडकरने कोर्टाला सांगितले होते. पूजा खेडकरने यूपीएससीला सादर केलेल्या दोन अपंगत्व प्रमाणपत्र यांच्यापैकी एक प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय असल्याचे दिल्ली पोलिसांनी आपल्या अहवालात हायकोर्टाला सांगितले होते. दरम्यान १९ सप्टेंबर रोजी हायकोर्टाने यूपीएससीने दाखल केलेल्या याचिकेवर नोटिस बजावली आणि २६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.

दिल्ली पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली हायकोर्टात अहवाल सादर केला. निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर केली होती. त्यापैकी एक बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान ३१ जुलै रोजी यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द केली होती. त्यानंतर तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घातली होती. आयोगाने पूजा खेडकरविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे देखील गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात यूपीएससीला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा दावा पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टमध्ये केला होता.  २०१९, २०२१, २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख व्हेरिफाय केली आहे. आयोगाने माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे आयोगाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे.

या सर्व प्रकरणाची दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात हायकोर्टाने पूजा खेडकरला अंतरिम जामीन दिला होता. दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टनुसार पूजा खेडकरने २०२२ आणि २०२४ मध्ये अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाकडून मिळवलेली दोन अपंगत्व प्रमाणपत्रे ही  बनावट असू शकतात.  पण त्यांची वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी केली असता त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे पूजा खेडकर दावा करत असलेले अपंगत्व प्रमाणपत्र वैद्यकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेले नसावे, असे प्राधिकरणाने  म्हटले आहे.

तसेच, आपण सिव्हिल सर्जन कार्यालयातील नोंदीनुसार अपंगत्व प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावाही वैद्यकीय प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचेही प्राधिकरणाने आपल्या उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे पुजा खेडकरने सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याची शक्यता  शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Controversial ias pooja khedkar relief from arrest by delhi high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 03:06 PM

Topics:  

  • delhi high court

संबंधित बातम्या

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
1

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

दिल्ली उच्च न्यायालयात निर्णायक क्षण! तुर्की कंपनी सेलेबीला सुरक्षा मंजुरी मिळणार की नाही? निर्णय सोमवारी
2

दिल्ली उच्च न्यायालयात निर्णायक क्षण! तुर्की कंपनी सेलेबीला सुरक्षा मंजुरी मिळणार की नाही? निर्णय सोमवारी

Justice Varma Case : कॅश कांड घोटाळ्यावरील रिपोर्टमुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अचडणीत वाढ, केंद्र सरकार महाभियोगाच्या तयारीत
3

Justice Varma Case : कॅश कांड घोटाळ्यावरील रिपोर्टमुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अचडणीत वाढ, केंद्र सरकार महाभियोगाच्या तयारीत

Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
4

Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.