Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाची दिग्गज ऑलिम्पिकपटू वेट लिफ्टर मीराबाई चानूसह 10 खेळाडूंचा पुरस्कार परत करण्याचा इशारा; मणिपूर हिंसाचारावरून शाहांना लिहलं पत्र

Manipur Violence Update : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर क्रीडा जगतातील सेलिब्रिटींनी कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहून त्यांनी लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पदक परत करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 31, 2023 | 08:02 PM
देशाची दिग्गज ऑलिम्पिकपटू वेट लिफ्टर मीराबाई चानूसह 10 खेळाडूंचा पुरस्कार परत करण्याचा इशारा; मणिपूर हिंसाचारावरून शाहांना लिहलं पत्र
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये हिंसाचाराची आग दिवसेंदिवस भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता क्रीडा जगतातील बड्या व्यक्तींनी याप्रकरणी सरकारला अल्टिमेटम देण्यास सुरुवात केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूसह मणिपूरमधील एकूण 11 क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच आपल्या राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित न केल्यास पुरस्कार परत करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये सध्या आरक्षणाचा वाद
मणिपूरमध्ये सध्या आरक्षणाचा वाद पेटला आहे. हे भांडण मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये आहे. अनुसूचित जमातीत आपला समावेश करण्याची मागणी मेईतेई करीत आहे. त्यांच्या मागणीमुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला आहे. परिणामी राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आता खेळाडूंनी भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहिणाऱ्या खेळाडूंमध्ये पद्म पुरस्कार विजेती वेटलिफ्टर कुंजराणी देवी, भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार बीम बीम देवी, बॉक्सर एल सरिता देवी आणि इतरांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारपुढे एकूण आठ मागण्या
केंद्र सरकारपुढे एकूण आठ मागण्या ठेवण्यात आल्या असून त्यापैकी एक मागणी महामार्ग खुला करण्याची आहे. “एनएच-2 अनेक ठिकाणी ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे हा महामार्ग लवकर खुला करावा. आम्हाला शांतता हवी आहे, असे वेटलिफ्टर कुंजा देवी यांनी आपल्या भावनिक संदेशात म्हटले आहे. आमच्याकडून सर्व काही घ्या, फक्त शांती द्या. ज्या प्रकारे दिल्ली आणि मुंबईचे लोक जीवन जगत आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आमचे जीवन शांततेने जगायचे आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायचे आहे की, आम्हाला शांततेशिवाय काहीही नको आहे.

बॉक्सर एल सरिता देवी
बॉक्सर एल सरिता देवी म्हणाली, आम्ही देशाची कीर्ती वाढवली आहे. क्रीडा जगतात मैतई समाजाचे मोठे योगदान आहे. तरीही लोकांच्या नजरेत आमचा आदर नाही, असे वाटते. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमची पदके परत करू. गृहमंत्री अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. सर्व पक्षांशी बोलून शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Countrys legendary olympian weight lifter meerabai chanu including 10 athletes warned to return awards letter to home minister amit shah on the manipur violence nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 08:01 PM

Topics:  

  • home minister amit shah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.