dehradun accident case news marathi news 6 students killed
नवी दिल्ली : देशामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता डेहराडूनमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये सहा तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पार्टीवरुन आलेल्या या सहा तरुणांना गाडी वेगाने पळवणे जीवावर बेतले. यामध्ये तीन मुलं तर तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे.
डेहराडूनमध्ये पार्टीवरुन परत येणारी तरुण मुलं मल्टी-युटिलिटी व्हेइकलने (MUV) बेफामपणे चालवत होती. डेहराडूनमध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या या भीषण कार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर आणखी एक गंभीर जखमी झाला. हा अपघात ओएनजीसी चौकात पहाटे 1.30 च्या सुमारास घडला. यामध्ये वेगात येणा-या इनोव्हा कारने कंटेनर ट्रकच्या मागून धडक दिली. यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला असून तरुणांचा मृत्यू झाला.
डेहराडूनमध्ये वेगवान MUV गाडी कंटेनर ट्रकला धडकली. यावेळी गाडीमध्ये असणारे 20 ते 25 वयांची सर्व तरुण मुलं होती. यामध्ये गुनीत सिंग, कामाक्षी सिंघल, नवीन गोयल, ऋषभ जैन आणि अतुल अग्रवाल (सर्व डेहराडूनचे रहिवासी) आणि हिमाचल प्रदेशातील चंबा येथील कुणाल कुकरेजा यांचा अपघातामध्ये त्या क्षणी मृत्यू झाला.
A tragic accident occurred in Dehradun 💔 where an overspeeding Innova collided with a container at around 1:30 am. Six young people, aged between 20 to 25, lost their lives in this devastating crash. It’s deeply disturbing to see the visuals from the scene. #Dehradunroadaccident pic.twitter.com/GWKA33fGmX
— Avneesh Mishra (@RajaMishra007) November 15, 2024
मंडळ अधिकारी (शहर) नीरज सेमवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतांमध्ये – तीन पुरुष आणि तीन महिला, सर्व 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. 25 वर्षीय सिद्धेश अग्रवाल नावाचा सातवा प्रवासी वाचला पण सिनर्जी हॉस्पिटलमध्ये त्याची प्रकृती गंभीर आहे.प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की कंटेनर ट्रक चालकाची चूक नव्हती, कारण वेगवान मल्टी-युटिलिटी व्हेइकल (MUV) ट्रकच्या मागील डाव्या भागावर आदळले, जे मोठ्या वाहनांमध्ये एक ब्लाईंड स्पॉट आहे. त्यामुळे कारवाई बाबत साशंकता निर्माण होत आहे.
डेहराडूनमधील या भीषण रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार दाखल करण्यात आलेली नसली तरी देखील पोलीस याबाबत पुढाकार घेऊन कारवाई करु शकतात. गाडीने मागून ट्रकला धडक दिल्यामुळे पोलीस संभाव्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत, कारण प्राथमिक तपासात ट्रक चालकाची चूक नाही.