sachin waze
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालय ने मुंबईचे माजी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंची याचिका फेटाळली. ज्यामध्ये अँटिलिया बॅाम्ब प्रकरणी कायदेशीर क्रियाकलाप निवारक कायदा (यूएपीए) अंतर्गत खटला चालवण्याची परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ति मुक्ता गुप्ता आणि न्यायमूर्ति अनीश दयाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
[read_also content=”धनुष्यबाणासोबतचं आता पक्षाध्यक्षपदावरच एकनाथ शिंदेंचा दावा…? https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shindes-claim-on-the-post-of-party-president-along-with-party-symbol-nrps-333453.html”]
पोलीस अधिकारी सचिन वाझेंना आज दिल्ली हाईकोर्टनं मोठा दणका दिला. उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया घराबाहेर बॅाम्ब मिळाल्याप्रकरणी वाझेंच्या विरुद्ध यूएपीए के अंतर्गत केस चालविण्यात येत होती. मात्र, या याचिकेवर आक्षेप घेणारी याचिका वाझे यांच्या कडून दाखल करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली.