एअर इंडियाचे फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग
समोर आलेल्या माहितीनुसार, बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यावर फ्लाइटचे लॅंडींग अहमदाबाद इथे करण्यात आले आहे. विमानातील एका क्रू मेंबरला टॉयलेटमध्ये बॉम्ब असे लिहिलेले आढळले. या फ्लाइटमधून 32 प्रवासी प्रवास करत होते. मात्र हे विमान अहमदाबादच्या एअरपोर्टवर सुरक्षितरीत्या लॅंडींग करण्यात आले आहे. सध्या याची तपासणी केली जात आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.






