बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या ‘सितरंग’ चक्रीवादळाचा (Sitrang Cyclone) परिणाम पश्चिम बंगालमध्ये हळूहळू दिसून येत आहे. रविवारी कोलकात्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. पूर्व मिदनापूरमध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. सितरंग चा प्रभाव पाहता बंगालच्या किनारी भागात विशेषतः सुंदरबनला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
[read_also content=”https://www.navarashtra.com/world/terrorist-attack-on-hotel-in-somalia-nine-people-were-killed-and-47-injured-in-the-blast-and-firing-nrps-338810.html सोमालियातील हॉटेलवर दहशतवादी हल्ला; बॉम्बस्फोट आणि गोळीबारात नऊ जणांचा मृत्यु, 47 जखमी”]
सीतरंग चक्रीवादळाचा प्रभाव सुरू झाला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता यासह दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सोमवारी सकाळी हलका पाऊस झाला आणि उत्तर बंगालच्या उपसागरात उठलेले ‘सितरंग’ वादळ किनारपट्टीजवळ येत असल्याने दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वादळ 25 ऑक्टोबरच्या पहाटे बांगलादेशातील तिकोना आणि संदीप दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकेल.
[read_also content=”कोरोना रुग्णांची घटतेय संख्या! देशात गेल्या 24 तासांत1,334 कोरोना रुग्णांची नोंद https://www.navarashtra.com/india/in-the-last-24-hours-1334-corona-patients-have-been-reported-in-the-country-nrps-338918.html”]
तर, सीतरंग चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर पश्चिम बंगालच्या उपसागरावर आणि पूर्व मध्य उपसागराला लागून असलेल्या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे आणि तीव्र चक्रीवादळात तीव्र होण्याच्या शक्यतेमुळे, मच्छिमारांना मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला असुन 25 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे.