ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हॅकींगबाबतचे आरोप हे भारतात वारंवार चर्चेचा विषय राहिले आहेत. महाराष्ट्रात काही महिन्यांपू्र्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. इतकेच नव्हे तर इतर राज्यांमधूनही विरोधी पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात येतो. या सगळ्यात अमेरिकेच्या अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (EVM) व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर चर्चा सुरू झाली आहे. “निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली हॅक केली जाऊ शकते.” असा दावा तुलसी गॅबार्ड यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, मंत्रिमंडळाकडे असे पुरावे आहेत की ही प्रणाली दीर्घ काळापासून सायबर हल्ल्यांसाठी असुरक्षित आहे. काही निवडणुकांमध्ये निकालांमध्ये फेरफार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत सर्वत्र कागदी मतपत्रिकांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. जेणेकरून मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वास वाटू शकेल.
शाळेच्या ताब्यासाठी दोन गटात तुफान राडा, जीवघेणा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत सांगितले की, गॅबार्ड यांनी मांडलेले मुद्दे भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमवर लागू होत नाहीत. भारतात वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम या पूर्णपणे ‘स्टँडअलोन’ असतात. त्या कोणत्याही प्रकारच्या इंटरनेट, नेटवर्क किंवा वायफायशी जोडलेल्या नसतात. त्यामुळे त्यांना हॅक करणे शक्य नाही.
भारतातील ईव्हीएम या अमेरिकेसह इतर देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या संगणकीय प्रणाली नसून, त्या अधिक अचूक आणि कॅल्क्युलेटर सारख्या स्वयंपूर्ण प्रणालीप्रमाणे कार्य करतात. सर्वोच्च न्यायालयानेदेखील भारतीय ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब केले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेळोवेळी या यंत्रांच्या कार्यपद्धतीची चौकशी केली असून, कोणतीही अनियमितता आढळलेली नाही.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाने एक विशेष व्यवस्था केली आहे. निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतला जातो, ज्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या चाचणीत मशीन योग्य प्रकारे कार्य करते की नाही हे प्रत्यक्ष तपासले जाते. पाच कोटींपेक्षा अधिक व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लिप्स मोजल्या गेल्या असून, त्या मतदान नोंदींशी तंतोतंत जुळल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड किंवा तक्रार आढळलेली नाही, असंही आयोगाने स्पष्ट केले.
मतांचे फेरफार: काही नेत्यांचा आरोप असतो की ईव्हीएममध्ये आधीपासूनच एका विशिष्ट पक्षासाठी प्रोग्रामिंग केले गेले आहे, जेणेकरून मत देणाऱ्याने कोणत्याही उमेदवाराला मत दिलं तरी ते दुसऱ्याच पक्षाला जाईल.
इंटरनेट किंवा ब्लूटूथद्वारे नियंत्रण: काही वेळा असेही म्हटले गेले आहे की ईव्हीएममध्ये वायरलेस तंत्रज्ञान वापरून बाहेरून हस्तक्षेप करता येतो.
व्हीव्हीपॅट (VVPAT) गोंधळ: मतदाराने दिलेले मत व्हीव्हीपॅट स्लिपवर दिसले तरी अंतिम मोजणीत त्या मताचा परिणाम नसल्याचा संशय काही वेळा व्यक्त केला जातो.