गेल्या 10-12 दिवसापासुन दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटुंच आंदोलन (Wrestlers protest) सुरूच आहे. या आंदोलनावरुन अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा ( PT Usha) बुधवारी निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचल्या. यावेळी त्यांनी कुस्तीपटुंशी बोलून आंदोलन मागे घेण्यास सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, मात्र कुस्तीपटूंनी तिचे ऐकले नाही, अशी माहिती समोर येत आहे. पीटी उषा यांनीही यापूर्वी म्हटले होते की, अशा पद्धतीने रस्त्यावर उतरुन हे खेळाडू देशाची प्रतिमा खराब करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टिका करण्यात आली.
[read_also content=”हस्तमैथुन आणि ओरल सेक्सनंतर आता मेट्रोमध्ये शॉर्ट स्कर्ट घातलेल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल! ‘या’ कृत्यानं वेधलं सर्वांच लक्ष https://www.navarashtra.com/viral/after-masturbating-and-oral-sex-a-video-of-a-girl-wearing-a-short-skirt-in-the-metro-has-gone-viral-394561.html”]