जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी चकमकीत 3 दहशतवादी शहीद झाले आहेत; तर ३ जवान जखमी झाले आहेत. येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला आहे. सुरणकोट तहसीलमधील बाफलियाज पोलिस स्टेशन मंडी रोड येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या घटनेनंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू आहे. लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, राजौरी पुंछ राष्ट्रीय महामार्ग हाय अलर्टवर आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे.
राजौरी येथील थानामंडी येथील डेरा गल्लीत 20 डिसेंबरच्या रात्रीपासून ही कारवाई सुरू होती. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.45 वाजता लष्कराच्या दोन गाड्या जवानांना ऑपरेशन एरियामध्ये घेऊन जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. हे ४८ राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक काल संध्याकाळपासून या भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील संयुक्त मोहिमेला बळ देणार होते.
दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती
संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले की, विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे काल रात्री संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि चकमक सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सैनिक पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.