Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांवर गुजरात पोलिसांची कारवाई, पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी – बाळासाहेब थोरात

आज राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवणूक करत चौकशी केली तर काही जणांना ताब्यात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 03, 2023 | 01:43 PM
राहुल गांधींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांवर गुजरात पोलिसांची कारवाई, पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी – बाळासाहेब थोरात
Follow Us
Close
Follow Us:

सुरत : “मोदी नावाचे सगळे चोर कसे” असं वक्तव्य राहुल गांधींनी ((Rahul Gandhi) 2019 मध्ये कर्नाटकमध्ये केलं होतं. दरम्यान, यावरुन सुरत कोर्टात सुनावणी पार पडली. मोदी (Modi) आडनाव प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टानं (Surat Court) राहुल गांधींना दोषी ठरवलं आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, आज शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राहुल गांधी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. दरम्यान, आज राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवणूक करत चौकशी केली तर काही जणांना ताब्यात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी – बाळासाहेब थोरात

दरम्यान, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत गुजरात येथे जात असलेल्या राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांना गुजरात पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेत आहेत. त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे निषेधार्ह आहे. गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी आहे. असं माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींसोबत सुरतमध्ये प्रियंका गांधी, अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंह सुखू (हिमाचल प्रदेश) हे तीन राज्यांचे मुख्यमंत्री, नाना पटोले आदी नेते राहुल गांधी यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित राहणार होते. पण काही नेत्यांना गुजरातमध्ये जाण्याआधीच गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवून त्यांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत “मोदी नावाचे सगळे चोर कसे” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारानं राहुल गांधींविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या विरोधात, न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत तब्बल 2 वर्षांनी शिक्षा सुनावली होती. तसेच ओबीसी समाजाचा राहुल गांधींनी अपमान केल्यामुळं समाजाचा भावना दुखावल्या आहेत, त्यामुळं राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी ओबीसी समाजाने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केले आहे. यानंतर या शिक्षेविरोधात राहुल गांधी याचिका दाखल करणार आहेत.

Web Title: Gujarat police action against leaders and activists going to gujarat in support of rahul gandhi police behavior stifling democracy balasaheb thorat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2023 | 01:42 PM

Topics:  

  • Surat

संबंधित बातम्या

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….
1

Surat Liquor Party News: सुनेच्या दारुपार्टीमुळे वैतागलेल्या सासऱ्याने फोनकरून दिली टीप; पोलिसांनी टाकली धाड आणि….

Fire News: सुरतच्या ‘हॅप्पी एक्सेलेंशिया’ बिल्डिंगमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
2

Fire News: सुरतच्या ‘हॅप्पी एक्सेलेंशिया’ बिल्डिंगमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.