Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक पटेल काँग्रेस सोडण्याच्या तयारीत ? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. येत्या काळात गुजरातमध्ये (Gujrat) देखील विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 25, 2022 | 04:09 PM
hardik patel

hardik patel

Follow Us
Close
Follow Us:

अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पाचही राज्यात पराजयाचा सामना केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस सपाटून मार खात असताना, काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. येत्या काळात गुजरातमध्ये (Gujrat) देखील विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

[read_also content=”एका व्यक्तीचे थोडेसे रक्त निघाले त्यावरून थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी कशी काय होऊ शकते; संजय राऊतांची आगपाखड https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-criticizes-bjp-nrvk-272994.html”]

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांनी आपला व्हॉट्स अ‍ॅप डीपी (WhatsApp DP) बदलला आहे. त्यांच्या डीपीमधून काँग्रेस गायब झाला असून त्यांनी भगवं वस्त्र परिधान केलेला फोटो लावला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप बरोबर टेलिग्रामवरील फोटो देखील बदलला आहे.

हार्दिक पटेल पक्षाला सोडचिठ्ठी देणार, या संदर्भाच्या बातम्या समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशाप्रकारच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र काही काळापासून हार्दिक पटेल हे पक्षाच्या हायकमांडवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी अनेकदा याबाबत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था नव्या वराची नसबंदी केल्याप्रमाणे झाल्याचंही त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. पक्षात निर्णय घेण्याबाबत आपल्याकडे कोणतीही अधिकार नाहीत, असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. हार्दिक पटेल हे सध्या गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

एवढेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी आपण रामाचा खूप मोठा भक्त असल्याचं म्हटलं होतं. तसेच वडिलांच्या मृत्यूनंतर आपण चार हजार गीता वाटणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. ‘माझ्या जन्म हिंदू धर्मात झाला असून हिंदू असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे,’ असंही ते म्हणाले होते. अशात हार्दिक पटेल यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवरील डीपीमधून काँग्रेस गायब करून त्याठिकाणी भगवं वस्त्र परिधान केलेला डीपी अपलोड केल्याने ते लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Web Title: Hardik patel may leave congress party nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2022 | 04:07 PM

Topics:  

  • Gujrat
  • Gujrat Politics
  • Hardik Patel

संबंधित बातम्या

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली
1

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.