नवी दिल्ली : देशभरातील हजारो स्मार्टफोनवर (Smartphone Message) सकाळी दहाच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट (Emergency Alert) आला. जर तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण हा मेसेज केवळ चाचणीसाठी असल्याचे समोर आले आहे. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.
केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.
मराठीमध्येही आलं नोटिफिकेशन
सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट काही लोकांना मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.