नवी दिल्ली – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे रविवारी सकाळी वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. १५५० फूट उंचीवर पक्षी त्याच्या चॉपरवर धडकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वैमानिकाच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली.
पक्षी धडकल्यानंतर पायलटने खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर परत पोलिस लाइन मैदानावर उतरवले. त्यामुळे सीएम योगी आदित्यनाथ यांना पोलीस लाईन ग्राउंडवरून सर्किट हाऊसकडे परतावे लागले. यानंतर मुख्यमंत्री सर्किट हाऊस येथून रस्त्याने लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ११ वाजता ते राज्याच्या विमानाने लखनऊला रवाना झाले.
सीएम योगी आदित्यनाथ सकाळी ९ वाजता लखनऊला सर्किट हाऊसहून पोलीस लाईन ग्राउंडसाठी रवाना झाले. काही वेळाने त्यांचे हेलिकॉप्टर येथून निघाले. डीएम कौशल राज शर्मा यांनी सांगितले की, १० मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा पोलिसांच्या मैदानावर उतरले. त्यामुळे पोलिस व प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मुख्यमंत्री खाली आले तेव्हा समजले की, पिसौर पुलाजवळ १५५० फूट उंचीवर आकाशात एका पक्ष्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली.