Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाकुंभवर ‘HMPV’ व्हायरसचं सावट! उत्तर प्रदेशमध्ये आढळला पहिला रूग्ण, चिंता वाढली

प्रयागमध्ये महाकुंभ लवकरच सुरू होणार असून याची जोमात तयारी सुरू झाली आहे. यावेळी महाकुंभदरम्यान कोणत्या सुविधा आणि सोयी करण्यात आल्या आहेत याबाबत भक्तांना माहीत असायलाच हवे

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2025 | 12:08 PM
महाकुंभवर 'HMPV' व्हायरसचं सावट! उत्तर प्रदेशमध्ये आढळला पहिला रूग्ण, चिंता वाढली

महाकुंभवर 'HMPV' व्हायरसचं सावट! उत्तर प्रदेशमध्ये आढळला पहिला रूग्ण, चिंता वाढली

Follow Us
Close
Follow Us:

HMPV मुळे चीनमध्ये दहशतीचं वातावरण आहे, तर भारतातही याबाबत देखरेख सुरू करण्यात आली आहे. कोविड-19 व्यतिरिक्त या विषाणुची लहान मुलांना लागण होत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. दरम्यान देशात अनेक शहरांमध्ये या व्हायरसचे काही रूग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातमध्ये या व्हायरसशी सबंधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात देखील या एचएमपीव्ही व्हायरसचे रूग्ण आढळून आला आहे. महाकुंभ सोहळ्याआधी अशा प्रकारचा रूग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लवकरच उत्तरप्रदेशमध्ये महाकुंभ होणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 12 रूग्ण आढळून आले आहेत. लखनौ येथे एका 60 वर्षीय महिला या आजाराने बाधित झाली आहे. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे समजते आहे.

तीर्थराज आणि त्रिवेणी संगम असलेल्या प्रयागमध्ये लवकरच महाकुंभ सुरू होणार आहे. त्याची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कडाक्याच्या थंडीत देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ऋषी, संत आणि महात्म्यांचा मेळा प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लखनौमध्ये hmpv चा रूग्ण आढळून आल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान या व्हायरसमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: HMPV Virus : HMPV व्हायरसबाबत मोठी अपडेट; या काळात जन्मलेल्या मुलांना अधिक धोका

HMPV ची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखी आहेत. यामुळे मानवाच्या फुफ्फुसात आणि श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. अशा आजारांनी किंवा ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांना या विषाणूची लागण होणे खूप सामान्य आहे. लहान मुले सर्दी, खोकल्यासारख्या सामान्य आजारांना सहज बळी पडतात. अशा परिस्थितीत, मुलांमध्ये या विषाणूचा प्रसार अगदी सामान्य आहे. केवळ भारतातच नाही तर चीनमध्येही एचएमपीव्हीची सर्वाधिक प्रकरणे लहान मुलांमध्ये दिसून आली आहेत.

चीनमधील मुलांमध्ये आढळलेल्या एचएमपीव्हीची प्रकरणे लक्षात घेऊन, भारतीय सशस्त्र दलाचे माजी क्षेत्र महामारी तज्ज्ञ डॉ. अमिताव बॅनर्जी म्हणाले, ‘चीनमधील सध्याची परिस्थिती रोगप्रतिकारक शक्तीमुळे आहे. याचा अर्थ असा की, महामारीच्या काळात, अनेक मुलांना त्यांच्या सुरुवातीच्या महिन्यांत अनेक प्रकारच्या विषाणूंचा सामना करावा लागला नाही आणि आता ते त्यांच्याविरूद्ध प्रतिकारशक्तीच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत.

फक्त 3 हजार रुपयांत हेलिकॉप्टरने देता येईल महाकुंभ मेळ्याला भेट

आता केवळ 3 हजार रुपयांत हेलिकॉप्टरमधून भाविकांना संगमाचे पवित्र दर्शन घेता येणार आहे. पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड सर्व्हिसेसच्या मदतीने ही सेवा 12 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान उपलब्ध असेल. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बुक करू शकता.

हेही वाचा: फक्त 3 हजार रुपयांत हेलिकॉप्टरने देता येईल महाकुंभ मेळ्याला भेट, कुठून तिकीट बुक करावं? जाणून घ्या

हेलिपॅडची कोणकोणती ठिकाणे असतील?

  • महाकुंभ परिसरात तिसऱ्या ठिकाणी हेलिपॅड बांधले जात आहेत
  • ओमॅक्स सिटीजवळ, झुंसी पोलिस स्टेशनच्या मागे, एरेल ठिकाणी
  • शहर परिसरात असलेल्या बोट क्लबजवळ
  • प्रत्येक हेलिपॅडवर दोन हेलिकॉप्टर असतील, ज्यामध्ये एकावेळी 4-5 लोक प्रवास करू शकतात
  • सुविधा आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल
  • हेलिपॅडवर वेटिंग रूम, तिकीट विंडो, अग्निशमन व्यवस्था, अँब्युलन्स आदी सुविधा असतील

 

Web Title: Hmpv virus first patient detect in lucknow up before mahakumbh festival prayagraj latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Lucknow

संबंधित बातम्या

India’s First AI City: हे शहर बनणार भारतातील पहिले ‘AI City’! सरकारने घेतला मोठा निर्णय, कोणते बदल होणार? जाणून घ्या
1

India’s First AI City: हे शहर बनणार भारतातील पहिले ‘AI City’! सरकारने घेतला मोठा निर्णय, कोणते बदल होणार? जाणून घ्या

मालमत्ता खरेदीदारांना दिलासा, सर्कल रेटमध्ये वाढ असूनही एलडीएने घेतला ‘हा’ निर्णय
2

मालमत्ता खरेदीदारांना दिलासा, सर्कल रेटमध्ये वाढ असूनही एलडीएने घेतला ‘हा’ निर्णय

प्रियकरासाठी आईला दिल्या झोपेच्या गोळ्या, विष देऊन ठार मारण्याचा कट फसला, १५ वर्षीय मुलीचा भयंकर कृत्य
3

प्रियकरासाठी आईला दिल्या झोपेच्या गोळ्या, विष देऊन ठार मारण्याचा कट फसला, १५ वर्षीय मुलीचा भयंकर कृत्य

“साहेब..! माझा भाऊ मला जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो, आईपण शांतपणे करत राहण्यास सांगते, …’ मुलीने दाखल केला गुन्हा
4

“साहेब..! माझा भाऊ मला जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो, आईपण शांतपणे करत राहण्यास सांगते, …’ मुलीने दाखल केला गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.