
दोषींना फाशी झालीच पाहिजे, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये - ममता बॅनर्जी
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी स्थापन केलेली I.N.D.I.A. युतीची पुढील बैठक ६ डिसेंबरला होणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी बैठकीबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत आघाडीच्या बैठकीबाबत प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मला याबाबत माहिती नाही आणि उत्तर बंगालमध्ये माझे काही कार्यक्रम नियोजित आहेत. मला याबाबत माहिती असती तर मी या बैठकीला उपस्थित राहिले असते.परंतु आता मी पूर्वनियोजित अशा उत्तर बंगालच्या दौऱ्यावर जात आहे.”
‘माहिती असती तर नक्कीच गेले असते’
न्यूज एजन्सी एएनआयनुसार, टीएमसी सुप्रिमो म्हणालया , “मला बैठकीबाबत माहित नाही. माझ्याकडे काही माहिती नाही. म्हणूनच मी इतर कार्यक्रम ठेवला. आमचा कार्यक्रम उत्तर बंगालमध्ये आहे. आमचा दिवसाचा कार्यक्रम तिथे आहे. जर माझ्याकडे माहिती असती तर मी कोणताही कार्यक्रम न ठेवता तिकडे . नक्कीच गेले असते”
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे ठणकावून सांगितले
आधीच ठरली होती I.N.D.I.A. ची बैठक!
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने ६ डिसेंबरला विरोधी पक्षांच्या भारत आघाडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारत आघाडीत सामील असलेल्या पक्षांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर I.N.D.I.A. आघाडीची बैठक बोलावण्याचे आधीच ठरले होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच याकडे लक्ष वेधले होते. ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत जागावाटप हा सर्वात मोठा मुद्दा ठरणार असल्याचे मानले जात असून त्यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.