भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ध्रुवास्त्र क्षेपणास्त्र ताफ्यात सामील होण्यास सज्ज, शत्रूचा उडणार थरकाप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ध्रुवास्त्र हे भारताच्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग आहे. याची संकल्पना १९८० च्या दशकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आली होती.
प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत १ कोटी रुपयापेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे, याच्या तैनातीमुळे भारताला रशिया किवा युरोपमधून कोनकुर्स आणि मिलान सारखी जुनी क्षेपणास्त्रे आयात करण्याची गरज कमी होईल. ध्रुवास्त्रच्या यशानंतर, डीआरडीओ आता ‘संत’वर काम करत आहे. त्याची मारक क्षमता आणखी जास्त असेल आणि ते मिलीमीटर-वेव्ह रखारसारख्या अधिक प्रगत सेन्सर्सनी सुसज्ज असेल.
हे देखील वाचा : India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






