Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा: कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
पहिला रेक जेएनपीटी ते वडोदरा असा असून त्याचा लोड ४५+१, लोको क्रमांक ६०३११ आणि एकूण वजन १,८१७ टन होते. दुसरा रेक देखील जेएनपीटी ते वडोदरा मार्गावरच असून त्याचा लोड ४५-१, लोको क्रमांक २४६९० आणि वजन २,१०५ टन होते. दोन्ही रेक एकत्रितपणे ३,९२२ टन वजनासह ३६० कंटेनरची वाहतुक करण्यात आली. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण करणे शक्य झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जलद वाहतूक, खर्चातही बचत
या नव्या प्रयोगामुळे अनेक फायदे होणार आहेत. सर्वांत मोठा फायदा म्हणजे बंदर आणि टर्मिनलवरील गर्दी कमी होईल. एकाच वेळी जास्त कंटेनर गेल्याने कंटेनरचा थांबा वेळ म्हणजेच ड्वेलिंग टाइम कमी होईल आणि जलद वाहतूक शक्य होईल, एकाच फेरीत जास्त माल गेल्याने लोकोमोटिव्ह आणि फ्लॅट वॅगनची गरज कमी लागेल. तसेच मार्गाच्या क्षमतेचा अधिक चांगला वापर होऊन एकूण ट्रान्झिट वेळेत घट होईल. यामुळे जेएनपीटीसारख्या महत्वाच्या बंदरातून मालाची जलद वाहतूक होईल आणि वाहतूक खर्चातही कपात होईल.
हरित आणि शाश्वत वाहतुकीला मिळाले बळ






