आपल्यापैकी कित्येक लोकांना देश सोडून परदेशात जाताना (Indian Moved To foreign ) बघितलं असेल. बहुतांश भारतीयांच्या देश सोडून जाण्यामागे असलेल्या कारणापैकी एक महत्त्वाच कारण म्हणजे चांगली नौकरी. भारताच्या तुलनेत परदेशात मिळणारं वेतन आणि सोईसुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं देश सोडून जातात. या बाबतीतला हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुकताच समोर आला असून 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व (indian citizenship) सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर, भारत सोडून जाणाऱ्या करोडपतींच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. परंतु, व्यावसायिकांमध्ये परदेशात जाण्याची स्पर्धा पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहे
[read_also content=”भर पावसात छत्री विकतोय अभिनेता सुनील ग्रोव्हर, ‘ही काय अवस्था करुन घेतली’ चाहत्यांचे कंमेट! https://www.navarashtra.com/movies/actor-sunil-grover-selling-umbrellas-in-the-rain-nrps-436424.html”]
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2010 पर्यंत, नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वार्षिक 7% दराने वाढत होते. आता हा दर २९ टक्के झाला आहे.
गेल्या 12 वर्षांत म्हणजे 2011 ते 2022 या काळात 13.86 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. यापैकी 7 लाख अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांमध्ये करोडपतींची संख्या केवळ 2.5% आहे. म्हणजेच, ज्यांनी नागरिकत्व सोडले आहे, त्यापैकी ९७.५% नोकरदार आहेत, जे चांगल्या संधींसाठी परदेशात गेले आहेत.
संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. तर 2021 मध्ये 1.63 लाख लोकांनी आपले नागरिकत्व सोडले होते. 2020 मध्ये, किमान 85 हजार लोक परदेशात स्थायिक झाले. 2010 नंतर ही संख्या सर्वात कमी होती, कारण तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता.
भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते. व्यावसायिकांसाठी अमेरिका आणि उद्योगपतींसाठी ऑस्ट्रेलिया-सिंगापूर ही प्रमुख ठिकाणे आहेत. येथे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकत्व घेण्यासाठी सुरुवातीच्या वर्षांत नाममात्र कर लागतो.