होळीपूर्वी (Holi 2023) देशाची राजधानी दिल्लीतील जनतेला महागाईचा (Inflation) आणखी एक झटका बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत आता दिल्लीत 1,103 रुपये झाली आहे.
[read_also content=”ग्रीसमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना! मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक; 26 जणांचा मृत्यू 85 हून अधिक जखमी https://www.navarashtra.com/world/26-dead-and-over-85-injured-in-train-accident-in-greec-enrps-373172.html”]
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 350.50 रुपयांनी वाढल्या आहेत. दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2119.50 रुपये झाली आहे.