पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! इनोव्हा कार नदीत कोसळून 9 ठार, दोन बेपत्ता
पंजाब-हिमाचलच्या सीमावर्ती भागातील होशियारपूरच्या जेजो दोआबामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या पुरात इनोव्हा कारमधील नऊ जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्याच वेळी, अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही. पोलिसांचे पथक बचाव कार्य सुरु असून दोन बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह पुरातून बाहेर काढण्यात आले. नवांशहर पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन अपघाताचा तपास सुरू केला आहे. मृत नागरिक हिमाचलहून पंजाबच्या नवानशहर लग्नसोहळ्यात जात होते.
होशियारपूरचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, आज (11 ऑगस्ट) सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीला पूर आला. हे लोक हिमाचलहून पंजाबमधील नवनशहर येथे लग्नाच्या वरातीसाठी येत होते. सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत. गाडी रस्त्यावरून जात असताना नदीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. कार ओलांडून जाईल, असे ड्रायव्हरला वाटले, मात्र अचानक प्रवाह वाढला आणि इनोव्हा कार पुराच्या पाण्यात वाहू लागली. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी इनोव्हामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
लोकांनी जेसीबी मागवून लोकांना जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांनी एका मुलाला वाचवले. मात्र गाडीचा दरवाजा न उघडल्याने कारमधील प्रवास करणारे उर्वरित लोक पुरात वाहून गेले. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून एनडीआरएफच्या टीम दाखल झाले. पथक आल्यानंतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू झाला. या शोधात आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित बेपत्ता लोकांच्या शोधासाठी खोऱ्यात शोधमोहीम सुरू आहे.
अपघातात दीपक भाटिया मुलगा सुरजीत भाटिया (रा. डेहलन), सुरजीत भाटिया मुलगा गुरदास राम, परमजीत कौर पत्नी सुरजीत भाटिया, सरूप चंद, आंटी बाईंडर, शिन्नो, भावना (18 वर्षे), दीपक भाटिया यांची मुलगी अंजू (20 वर्षे), दीपक भाटिया, दीपक भाटिया यांचा मुलगा हरमीत (१२ वर्षे) यांची मुलगी, अशी या मृत नागरिकांची नावे आहे. या दुःखद घटनेनंतर देहलण गावात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकरी व कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले की, आम्हाला अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने अधिकारी घटनास्थळी पाठवले. शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे आणि अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या घटनेचे आम्हाला मनापासून खेद आहे. होशियारपूरचे खासदार डॉ. राजकुमार चब्बेवालही घटनास्थळी पोहोचले. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.