Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhalawar School Roof collapsed: झालवाडमध्ये शाळेवर काळाचा घाला; छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जखमी

शाळेचे छत कोसळल्यानंतरचे काही फोटोही समोर आले आहेत. यामध्ये शिक्षकांसह स्थानिक नागरिक ढिगारा उचलताना दिसत आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या एकूण मुलांची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 25, 2025 | 11:37 AM
Jhalawar School Roof collapsed: झालवाडमध्ये शाळेवर काळाचा घाला; छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जखमी
Follow Us
Close
Follow Us:

Jhalawar School Roof collapsed:  राजस्थानच्या झालावाडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे झालवाडमधील मनोहरठाणा परिसरातील पिपलोदी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याची माहिती आहे. छत कोसळल्याने शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ढिगाऱ्याखाली गाडल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, १७ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. सध्या सर्व उच्च पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीने ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. जखमी मुलांना मनोहर ठाणे सीएससी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या प्रकरणी राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Israel Palestine Live: फ्रान्सचा ऐतिहासिक निर्णय, पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार, हमासला आनंद तर इस्रायल संतापला

गावकऱ्यांनी काय सांगितले?

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी वर्गात पन्नासहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. छत कोसळताच मोठा आवाज ऐकू आला आणि आरडाओरडा आणि ओरड ऐकू आली. लगेच गावकरी आणि शिक्षकांनी ढिगारा काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना खाजगी वाहनांनी मनोहरठाणा सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अनेक मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. पण या घटनेनंतर शाळेची इमारत इतकी जीर्ण झाली असतानाही त्याकडे दुलर्क्ष का करण्यात आले, असे प्रश्न पालकांसह स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जखमी विद्यार्थ्यांना चांगले उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

दरम्यान, शाळेचे छत कोसळल्यानंतरचे काही फोटोही समोर आले आहेत. यामध्ये शिक्षकांसह स्थानिक नागरिक ढिगारा उचलताना दिसत आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या एकूण मुलांची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण ढिगाऱ्याखाली सुमारे ५० मुले गाडली गेली असावीत, अशी शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे. मुलांना अजूनही बाहेर काढले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या आहेत. सर्व कचरा जेसीबीने काढण्याचे काम सुरू आहे.

‘एक मराठी माणूस कधी…’ भाषा विवादादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे JNU मध्ये मोठे विधान

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची एक पोस्टही शेअर केली आहे. त्यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत ट्विटर एक्सवर भावना व्यक्त केल्या आहेत. ” झालावाडमधील मनोहरथाना येथील सरकारी शाळेची इमारत कोसळल्याने अनेक मुले आणि शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. कमीत कमी जीवितहानी व्हावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Jhalawar school roof collapsed blackout on school in jhalawar 4 students killed 17 injured as roof collapses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 11:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.