कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) आपल्या एका निकालात म्हटले आहे की, पत्नीने पतीला काळे म्हणवून त्याचा अपमान करणे ही क्रूरता आहे. या आधारावर घटस्फोट (Divorce) दिला जाऊ शकतो, असं निरिक्षण नोंदवत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मान्यता दिली. पत्नीने पतीला काळे म्हणत त्याचा अपमान केला होता आणि त्यामुळेच ती इतर कोणत्याही कारणाशिवाय त्याच्यापासून वेगळी राहत होती. असही न्यायलयाच्या निरिक्षणात आलं आहे.
[read_also content=”शर्लिन चोप्राने राहुल गांधींसोबत लग्न करण्याची व्यक्त केली इच्छा, पण समोर ठेवली ‘ही’ अट https://www.navarashtra.com/latest-news/sherlyn-chopra-wanted-to-marry-rahul-gandhi-on-one-condition-nrps-442306.html”]
पत्नी पतीला काळं म्हणून हिणवतं होती. मात्र, स्वत:चा बचाव करण्यासाठी तिने पतीवर अवैध संबंध असल्याचा खोटा आरोप केला असल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. ही क्रूरता आहे. त्यानंतर, उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(i)(a) नुसार जोडप्याला घटस्फोट मंजूर केला. या जोडप्याने 2007 मध्ये लग्न केले आणि दोघांना एक मुलगी आहे. पतीने 2012 मध्ये बेंगळुरू येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
ती सारखी त्याचा अपमान करायची पण फक्त मुलीमुळे तो तिचा अपमान सहन करत होता. असं महिलेच्या सासरच्या मंडळीनी सांगितलं. तसेच, महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध आयपीसी कलम ४९८अ अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता. घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला असून ती आपल्या लहान मुलीसह आई-वडिलांसोबत राहत होती.
महिलेने मात्र, तिच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आणि पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले. 2017 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने दोघांची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. जिथे उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.