चंदीगड: भारताची माजी महिला कुस्तीपटू कविता दलाल हिचे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यामागील कारण म्हणजे दंगल ते WWE रिंगणात आपल्या चालींनी विरोधकांना थक्क करणारी कविता दलाल हरियाणाच्या निवडणुकीच्या रिंगणात आता नशीब आजमावणार आहे.
‘लेडी खली’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कविता दलाल आम आदमी पार्टीने हरियाणा निवडणुकीसाठी जुलानामधून तिकीट दिले आहे. या घोषणेनंतर दुलाना विधानसभा मतदारसंघाची लढत खूपच रंजक होणार आहे. कविता दलाल ‘लेडी खली’ म्हणून प्रसिद्ध आहे. पण निवडणुकीच्या रिंगणात तिचा सामना ऑलिम्पिक पदक विजेती विनेश फोगटशी होणार आहे. अशा परिस्थितीत तिच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल.
हेही वाचा : टाटाचा समूहाचा महत्वपूर्ण निर्णय, इलेक्ट्रिक वाहनासाठी उभारणार 200 फास्ट-चार्जिंग स्टेशन्स
माजी WWE कुस्तीपटू कविता दलाल जिंद जिल्ह्यातील असूनही तिचे लग्न बागपत जिल्ह्यातील बिजवाडा गावात झाले आहे. तिला लेडी खली म्हणूनही ओळखले जाते. 2022 मध्ये तिने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करून राजकारणात प्रवेश केला. दिल्लीतील जंतरमंतरवर विनेश फोगाट आणि इतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला तिने पाठिंबा दिला होता. मात्र, आता निवडणुकीच्या रिंगणात तिचा सामना विनेशशी होणार आहे.
भारतातील दिग्गज कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या द ग्रेट खलीसोबत कविता दलालचे खास नाते आहे. तिने खलीकडून कुस्तीचे अनेक डावपेच आणि युक्त्यांचे धडे गिरवले आहेत. खलीनेच कविताला WWE साठी त्याच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिले. डब्ल्यूडब्ल्यूई खेळाडू होण्यापूर्वी कविता देवी कविता आणि हार्ड केडी या नावाने स्वतंत्रपणे कुस्ती खेळत होत्या.
हेही वाचा : जरांगेंपाठोपाठ हाकेंची देखील पाडापाडीची भाषा; राज्यात ‘इतक्या’ आमदारांना पराभूत करण्याचा
कविताच्या आयुष्यावर लवकरच एक बायोपिकही येणार असल्याची चर्चा आहे. कविताचा बायोपिक विशेषतः कविताचा मोठा भाऊ संजय दलाल याने तिला लहानपणापासून कसा पाठिंबा दिला हे या चित्रपटात दाखवले जाणार आहे. तिला या यशाच्या शिखरापर्यंत पोहचवण्यासाठी तिच्या भावांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, अशा मुद्द्यावर कविता दलालचा हा बायोपिक चित्रित करण्यात येणार आहे.