टाटाचा समूहाचा महत्वपूर्ण निर्णय, इलेक्ट्रिक वाहनासाठी उभारणार 200 फास्ट-चार्जिंग स्टेशन्स
टाटा पॉवर ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स प्रदाता व टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या उपकंपनीने आज भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता अशा सर्व मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी 200 फास्ट-चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून टाटा पॉवर टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक सीव्ही मालकांना विशेष चार्जिंग टेरिफ्स देतील, ज्यामुळे ग्राहकांसाठी कार्यसंचालन खर्च कमी होण्यासह फायदा वाढेल. देशभरातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन वापरकर्त्यांना लवकरच जवळपास 1000 धोरणात्मकरित्या स्थित फास्ट चार्जर्स उपलब्ध होतील, तसेच चार्जिंग नेटवर्कचे विस्तारीकरण करण्याची योजना देखील असेल.
हे देखील वाचा: हिवाळा सुरु होण्याअगोदर बाईकमध्ये करून घ्या ‘ही’ 5 कामं, मग बघा कशी सुसाट धावेल बाईक
टाटा पॉवरने ईझी चार्ज ब्रँड नावांतर्गत आपले नेटवर्क 530 शहरे व नगरांमध्ये 100000 हून अधिक होम चार्जर्स, 5500 हून अधिक सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक व ताफा चार्जिंग पॉइण्ट्सपर्यंत, तसेच 1100 हून अधिक बस चार्जिंग स्टेशन्सपर्यंत वाढवले आहे. हे चार्जर्स महामार्ग, हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल्स, कार्यालये, निवासी संकुल इत्यादी यांसारख्या विविध व उपलब्ध होण्याजोग्या ठिकाणी धोरणात्मकरित्या तैनात करण्यात आले आहेत. या सहयोगात्मक प्रयत्नामुळे भारतात इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या अपवादात्मक वाढीला चालना देण्यास मदत झाली आहे.
हे देखील वाचा:कार आणि बाईक ठीक होतं, पण आता ट्रॅफिक चलनात ही सूट! दिल्ली पोलिसांची अजब ऑफर
टाटा मोटर्स भारतातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक लघु व्यावसायिक वाहन एस ईव्ही देते, जिला देशभरातील 150 हून अधिक इलेक्ट्रिक व्हेईकल सर्विस सेंटर्सचे पाठबळ आहे. एस ईव्हीमध्ये प्रगत बॅटरी व्यवस्थापन सिस्टम व ‘फ्लीट एज’ टेलिमॅटिक्स, वेईकल अपटाइम व रस्त्यावरील सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्यासाठी उपयुक्त स्मार्ट तंत्रज्ञान आहे, तसेच वेईकल स्थिती, हेल्थ, लोकेशन आणि ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग वर्तणूकीबाबत रिअल-टाइम माहिती मिळते.
या सामंजस्य कराराबाबत आपले विचार मांडताना टाटा मोटर्सच्या एससीव्हीअॅण्डपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख विनय पाठक म्हणाले, ”आम्हाला देशभरात सोईस्कर ठिकाणी फास्ट चार्जर्स उपलब्ध करून देत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन लँडस्केपमध्ये बदल घडवून आणण्यासाठी टाटा पॉवरसोबतच्या आमच्या सहयोगाला अधिक दृढ करण्याचा आनंद होत आहे. आमचा जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने डिझाईन व उत्पादित करण्यासोबत या इको-फ्रेण्डली व उत्सर्जन-मुक्त वाहनांचा वापर अधिक वाढवण्याकरिता आवश्यक इकोसिस्टम विकसित करण्यास मदत करण्याचा देखील प्रयत्न आहे.