19 लोकांच्या मृत्यूनंतर Kolkata Police जागे झाले, व्हीआयपी पास रद्द, मार्गदर्शक सूचना जारी, सौजन्य : आयएएनएस
कोलकातामध्ये दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत 19 निष्पाप जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेच्या एक दिवसानंतर जागे झालेल्या कोलकाता पोलिसांनी ( Kolkata Police) रविवारी दुर्गा पूजा मंडळांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत.
या मार्गदर्शक सूचनेत महत्त्वाचा विषय असा की, कोलकातामधील सर्व मंडपांमध्ये देण्यात येणारे व्हीआयपी पास रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंडपाच्या प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर कोणत्याही प्रकारे खाद्य पदार्थांचे स्टॉल नसावे असे नमूद करण्यात आले आहे.
कोलकाता पोलीस आयुक्त अजय नंद यांनी या संबंधांत कोलकातामधील सर्व पोलीस स्टेशनला या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पोलीस, सुरक्षा कर्मचारी आणि मंडपाचे अधिकारी यांच्यात सातत्याने संवाद साधण्यासही सांगण्यात आले आहे.
आयुक्त यात म्हणतात की, आतापासून सार्वजनिक घोषणा यंत्रणेचे नियंत्रण पोलिसांच्या हातात असेल. त्याशिवाय मंडपात फक्त स्वयंसेवकच नाही तर कमीत कमी एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात राहिल. तसेच मंडपांचे प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करावा लागेल.
या मार्गदर्शक सूचनेत सांगण्यात आले की, मंडपाच्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर योग्य प्रकाश योजना गरजेची आहे. तसेच कोलकाता पोलिसांच्या सर्व निरिक्षकांना मॅनपॅक रेडियो सेट दिले जाईल, ज्याच्या माध्यमातून पूजा समितीसोबत त्यांना संपर्क कायम राखण्यास मदत होणार आहे.
West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू
पोलिसांनी रविवारी कोलकाताच्या चोरेबागान सार्वजनिक दुर्गा पुजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आयोजकांसमवेत सात जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत 19 भाविकांचा मृत्यू झाला होता. उत्तर कोलकाताच्या चोरेबागान सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीच्या मंडपात देवीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
यात काही वेळाने चेंगराचेंगरी झाली, ज्यात मोठ्या संख्येने भाविक जखमी झाले. मंडपाचा एक भाग कोसळल्यानंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व चेंगराचेंगरीचा प्रकार घडला असे सांगण्यात येत आहे.
जखमींना तातडीने कोलकाता मेडिकल कॉलेड आणि रुग्णालयासह इतर दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जवळपास 17 जणांचा मृत घोषित करण्यात आले असून येथे 25 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे रविवारी आणखीन दोन जखमींचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 19 वर पोहचली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू
Ans: चोरेबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला.
Ans: पोलिसांनी दुर्गापूजा मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यामध्ये व्हीआयपी पास रद्द करणे, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवणे आणि सार्वजनिक घोषणा यंत्रणेवर पोलिसांचे नियंत्रण ठेवणे यांचा समावेश आहे.
Ans: मंडपात किमान एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात करणे, पुरेशी प्रकाशयोजना ठेवणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल प्रवेशद्वारांपासून दूर ठेवणे आणि पोलीस व पूजा समित्यांमध्ये समन्वय राखणे अशा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.






