West Bengal वर दुर्गा कोपली...! रविवार ठरला 'अपघातवार', 5 जणांचा मृत्यू, सौजन्य : आयएएनएस
पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये नवरात्रीच्या काळात मोठ्या थाटामाटात दुर्गा पूजा पार पडते. आपल्याकडे जसा गणेशोत्सव थाटामाटात साजरा होतो, तसंच काहीसं येथे दुर्गा पूजेला महत्त्व आहे. मात्र शनिवारपासून घडणाऱ्या घटना पाहता पश्चिम बंगावर दुर्गा माता कोपली की काय? असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
शनिवारी रात्री कोलकातामध्ये झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी येथील दोन विविध रस्ते अपघातात 5 जण ठार झालेत.
पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात झाले. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या दोन्ही घटना दुर्गापुरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-19 वर घडल्या.
आसनोल-दुर्गापूर पोलीस कमिश्नरेटचे डीसीपी (ईस्ट) रासप्रीत सिंह म्हणाले की, रविवारी सकाळी दुर्गापूरमध्ये झालेल्या दोन्ही अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत वेगवान दुचाकीने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण व एक महिला दुर्गापूरच्या भिरिंगी चौकवरून पियालाच्या दिशेने जात होते. यावेळी वेगवान दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण गमावले गेले व तो पुढे असलेल्या ट्रकच्या मागे जोरात आदळला.
ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीवरील सर्व जण उडून वेगवेगळ्या दिशेले फेकले गेले. गंभीर रुपात जखमी असलेल्या तिघांना स्थानिकांनी दुर्गापूरच्या रुग्णालताय दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
स्थानिकांनी दावा केला आहे की, दुचाकीचा वेग अफाट होता. या धडकेनंतर दुचाकीचा पुढील चाक ट्रकच्या मागील बाजूस पुर्णपणे अडकला होता. नंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दुचाकी व ट्रकला वेगवेगळे केले. पोलीस आता घटनेच्यावेळी दुचाकीचा वेग किती होता, याचा तपास करत आहेत. तसेच दुचाकी चालवणाऱ्याने मद्यप्राशान केले होते का? हेही तपासले जात आहे.
दुसऱ्या घटनेत एका कारने बसला मागून जोरात धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग-19 वर दुर्गापूरवरून आसनसोलला जाताना अंदाल क्रॉसिंग सर्व्हिस रोडमध्ये प्रवेश करताना हा अपघात झाला. पोलिसांच्या मते, कारमध्ये चालकासमवेत 7 जण प्रवास करत होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 जण गंभीर जखमी आहेत. सर्वांवर बिधाननगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार कारमधील प्रवासी हे एका सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घेऊन घरी परतत होते. पोलिसांनी या दोन्ही अपघातांचा तपास सुरू केला आहे. अधिकारी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, या कारने बसला कशाप्रकारे धडक दिली व चालकाने वाहनावरील नियंत्रण कसे गमावले.






