Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी असणार पुढील लष्करप्रमुख; केंद्र सरकारने जाहीर केली नियुक्ती

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये विशेष असे काम केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2024 | 12:47 PM
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी असणार पुढील लष्करप्रमुख; केंद्र सरकारने जाहीर केली नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) हे भारतीय लष्कराचे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. याबाबतची नियुक्तीच केंद्र सरकारने जाहीर केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे (Manoj C. Pande) यांच्या पदाचा कार्यकाळ या महिन्यातील 30 तारखेला संपणार आहे. त्यापूर्वीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. पण, लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच आता त्यांच्या जागी उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. नव्या लष्करप्रमुखांच्या सेवेचा कार्यकाळ 30 जून 2024 पासून सुरू होणार आहे. याबाबतचे निवदेनही जारी करण्यात आले.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये विशेष असे काम केले आहे. त्यांच्या या दीर्घ सेवेनंतर आता त्यांची भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी?

उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 रोजी झाला. डिसेंबर 1984 मध्ये ते लष्करात नियुक्त झाले. उपेंद्र द्विवेदी यांचे प्राथमिक शिक्षण सैनिकी स्कूल, रेवा येथे झाले. यानंतर त्यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी डीएसएससी वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज महू येथून अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

विविध पदांवर नियुक्ती

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना लष्करात सुमारे 40 वर्षांचा अनुभव आहे. 15 डिसेंबर 1984 रोजी भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळात अनेक पदे भूषवली आहेत. त्यामुळे आता त्यांची लष्करप्रमुखपदावर नियुक्ती केली जात आहे.

Web Title: Lieutenant general upendra dwivedi will be the next army chief nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • New Army Chief

संबंधित बातम्या

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
1

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.