प्राचिन मंदिरं असलेल्या या १७ शहरांमध्ये दारुबंदी; सरकारचा ऐतिहासिक निर्णय
मध्य प्रदेश सरकारने प्राचिन मंदिरांसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धार्मिक आणि प्राचिन मंदिरं असणाऱ्या शहरांमध्ये दारुबंदीची घोषणा केली आहे. महेश्वरच्या कॅबिनेट बैठकीत १७ शहरात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी घेतलेल्या या निर्णयाची देशभर चर्चा सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटने १७ शहरात दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शहरांमध्ये उज्जैन, ओंकारेश्वर, मैहर, खजुराहो, महेश्वर, ओरच्छा, सांची, नलखेडा, सलकनपूर, जबलपूर, मंदसौरा या जिल्ह्यांच्या नावाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नर्मदा नदी पात्रातील ५ किलोमीटरच्या हद्दीत दारूबंदीचा निर्णय कायम राहणार आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कॅबिनेट बैठकीत सहभाग नोंदवण्याआधी याविषयी घोषणा केली होती. या बैठकीत दारुबंदीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते.
आज महेश्वर में लोकमाता देवी अहिल्याबाई जी के 300वें जयंती वर्ष के उपलक्ष्य में आयोजित कैबिनेट बैठक का शुभारंभ राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्” गायन के साथ हुआ।#महेश्वर_में_एमपी_कैबिनेट pic.twitter.com/3awZdvs5JA
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) January 24, 2025
कोणत्या १७ शहरात दारुबंदी?
नगरपालिका
दतिया (माँ पीतांबरा पीठ)
पन्ना (जुगल किशोर मंदिर)
मंडला (नर्मदा नदीचं पात्र)
मूलताई (ताप्ती नदीचं उगम स्थान)
मंदसौर (पशपतिनाथ मंदिर)
मैहर (माँ शारदा मंदिर)
नगर परिषद
ओंकारेश्वर (ज्योतिर्लिंग)
महेश्वर (नर्मदा नदीचं पात्र, प्रसिद्ध मंदिर)
मंडलेश्वर (नर्मदा नदीचं पात्र)
चित्रकूट (राम घाट )
अमरकंटक (नर्मादा नदीचं उगमस्थान)
ओरछा (रामराजा सरकार मंदिर)
ग्राम पंचायत
सकलनपूर (बिजयासन माता मंदिर)
बरमान कला (नर्मदा नदी पात्र)
लिंगा (प्रसिद्ध जैन मंदिर)
बरमान खुर्द (नर्मदा नदी पात्र)
कुंडलपूर (प्रसिद्ध जैन मंदिर)
बांदकपूर (देवश्री जागेश्वर नाथ मंदिर)