Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणूक 2024: केलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये 40 हजारांची तफावत; ADR चा अहवाल

लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीवरून  देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. प्रत्येक टप्प्याचे मतदान झाल्यानंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांनी अंतिम आकडेवारी जाहीर  केली जात होती. त्यावरून विरोधकांनी मोठा विरोधही केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2024 | 01:55 PM
लोकसभा निवडणूक 2024: केलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये 40 हजारांची तफावत; ADR चा अहवाल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या टक्केवारीवरून  देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. प्रत्येक टप्प्याचे मतदान झाल्यानंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांनी अंतिम आकडेवारी जाहीर  केली जात होती. त्यावरून विरोधकांनी मोठा विरोधही केला. त्यानंतर आता भारतीय राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणारी संघटना ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ च्या एका अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत जवळपास 5 लाख 54 हजार 598 मतांचा घोळ झाल्याचे आढळून आले आहे.

एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) चे संस्थापक प्रो. जगदीप छोकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 538  मतदारसंघात  पडलेल्या आणि मोजण्यात आलेल्या मतामंध्ये मोठी   तफावत नमूद करण्यात आली आहे. 362 जागांसाठी जेवढे मतदान झाले होते. त्यात 5 लाख 54 हजार 598 मते कमी मोजण्यात आली.  त्याचबरोबर 176 जागांसाठी  जेवढे मतदान झाले. त्याठिकाणी 35 गजार 93 मते जास्त मोजण्यात आली. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही अनेक जागांवरील प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे. त्यावेळी 347 जागांवर मतांमध्ये तफावत आढळून आली होती.

कोणत्या राज्यात किती तफावत

एडीआरच्या अहवालात यूपीच्या 55 ​​जागांचा उल्लेख करण्यात आला आहे. युपीमध्ये 53, 960 ने कमी मतांची मतमोजणी झाली आहे.  25 जागा अशा आहेत जिथे 6 हजार 124 मते जास्त मोजली गेली आहेत. याशिवाय दिल्लीच्या सर्व 7 जागांवर 8 हजार 159 कमी मतांची मतमोजणी करण्यात आली. तर उत्तराखंडच्या 5 जागांवर 6 हजार 315 कमी मतांची मतमोजणी झाली आहे.

झारखंडमधील लोकसभेच्या एकूण 14 जागांपैकी 12 जागांवर 26 हजार 342 कमी मतांची मतमोजणी करण्यात आली. तर दोन जागा अशा आहे, ज्याठिकाणी एकूण मतांपैकी 393 अधिक मतांची मतमोजणी करण्यात आली आहे. याशिवाय बिहारमधील एकूण 40 जागांपैकी 21 जागांवर 5 हजार 015 मते जास्त मोजली गेली. तर 19 जागांवर एकूण मतांपेक्षा 9हजार 924 कमी मतांची मोजणी झाली आहे.

महाराष्ट्राचा अहवाल काय म्हणतो?

एडीआरच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 मतदारसंघांपैकी 35 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानापैकी 38 हजार 710  इतकी कमी मते मोजण्यात आली. तर 13 मतदारसंघांमध्ये 1 हजार 642 मते अधिक मोजली गेली. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 40 हजार 352 मतांची विसंगती आढळून आली आहे.

धक्कादायक म्हणजे एडीआरच्या अहवालात, मतमोजणीतील सर्वात अधिक विसंगती नांदेड़ लोकसभा मतदारसंघात दिसून आली आहे. याठिकाणी 4 हजार 900 मते मोजलीच गेली नाहीत. तर  चंद्रपूर आणि जालना मतदारसंघातही 3 हजारांहून अधिक मतांचा फरक आढळून  आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील निवडणुकही चांगलीच वादग्रस्त ठरली  आहे. याठिकाणी एकूण मतदानापैकी केवळ दोन मते अधिकची मोजण्यात आली. या मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले. या प्रकरणी  ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Web Title: Lok sabha elections 2024 shocking revelation in adrs report more votes counted than not cast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 01:21 PM

Topics:  

  • Maharashtra Political News

संबंधित बातम्या

Anjali Damania News: ‘उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची मालिका सुरू’; अंजली दमानियांच्या नव्या ट्विटने खळबळ
1

Anjali Damania News: ‘उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची मालिका सुरू’; अंजली दमानियांच्या नव्या ट्विटने खळबळ

Manikrao Koakate : अजित पवारांचे ‘माणिक’रावांवर मौन? माध्यमांनी प्रश्न विचारताच फिरवले तोंड
2

Manikrao Koakate : अजित पवारांचे ‘माणिक’रावांवर मौन? माध्यमांनी प्रश्न विचारताच फिरवले तोंड

मुंबई- पुणे प्रवास होणार वेगवान! महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी
3

मुंबई- पुणे प्रवास होणार वेगवान! महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी

Top Marathi News Today Live: विरोधकांना आयते कोलीत देऊ नका…; फडणवीसांचा आमदारांना इशारा
4

Top Marathi News Today Live: विरोधकांना आयते कोलीत देऊ नका…; फडणवीसांचा आमदारांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.