महागाईच्या झळा बसत असताना मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल सह सिलेंडरच्या (lpg cylinder) बाबत ही मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरमध्ये 200 रुपयांची कपात केली जाणार आहे. उज्ज्वला योजना एलपीजी सिलेंडर घेतलेल्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. सध्या सिलेंडरचे दर 1000 रुपयांच्या वर गेले आहेत. पण उज्ज्वला योजनेतील कुटुंबांना 200 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळणार आहे.
[read_also content=”राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – रामदास आठवले https://www.navarashtra.com/latest-news/raj-thackeray-should-apologize-to-north-indians-ramdas-athavale-282978.html”]