Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटले! आतापर्यंत 9 जणांनी गमावला जीव, सीएमकडून शांततेचं आवाहन, सौजन्य : आयएएनएस
मणिपूरच्या डोंगराळ भागातील तीन जिल्हे कामजाँग, अखरुल आणि कांकपोकमीमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री पाहण्यास मिळाली. नागा आणि कुकी समाजाच्या या नव्या हिंसक चकमकीत (Manipur Violence) आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली.
अधिकारी पुढे म्हणाले की, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या हिंसेत 6 नागा आणि 2 कुकी व गोरखा समुदायाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यंदाच्या वर्षी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांपैकी ही घटना सर्वात घातक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री यमुनाम खेमचंद सिंह यांनी हिंसा आणि निर्दोष नागरिकांच्या हत्येची निंदा करताना लोकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्काळ योग्य ते पाऊल उचलण्याचेही निर्देश दिलेत.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स व फेसबूकवर पोस्ट केली आहे. ज्यात ते म्हणाले की, कामजाँग आणि कांगपोकपी जिल्ह्यातील निर्दोष नागरिकांची हत्या व हिंसाचाराचा मी निषेध करतो. मी अधिकाऱ्यांना स्थिती नियंत्रणात आणणे, शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासह सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ व प्रभावी नियोजन करण्याचे आदेश दिलेत.
त्यांनी विविध समुदाय, जनप्रतिनिधी आणि नागरिक संघटनांना पुढे येत संयम राखणे व तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजातील विविध वर्गांना शांति, संवाद आणि आपापसात सद्भावना निर्माण करण्यास प्राथमिकता द्या अशीही विनंती केली आहे.
अभिजित दीपकेसह सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; कोर्टाने दिले सुटकेचे निर्देश
अधिकाऱ्यांच्या मते, हिंसेचा प्रभाव पाहता तिनही जिल्ह्यांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि मणिपूर पोलिसांनी गस्त तसेच शोध मोहिमेला वेग दिला आहे, जेणेकरून स्थिती आणखीन बिघडण्यापासून रोखता येऊ शकेल. दरम्यान, हा हिंसाचार शुक्रवारी रात्री कामजाँग जिल्ह्यातील चासाद गावातील 42 वर्षीय महिलेच्या हत्येनंतर सुरू झाली. कामजाँग जिल्ह्यात मुख्य रुपात नागा समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो, पण चासाद गावात कुकी समुदायाच्या लोकांची बहुसंख्या आहे.
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने इंफाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाच मुलांची आई असलेल्या डोमखोनेई ताउथांगच्या गळ्यात गोळी मारण्यात आली. तिचा जागीच मृत्यू झाला.
या महिलेच्या हत्येनंतर कुकी आणि नागा समुदातील सशस्त्र गटामध्ये बेधुंद गोळीबार सुरू झाला, जो शनिवारपर्यंत कायम होता. या काळात 23 वर्षीय एका तरुणाचाही मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा जास्त घरं जाळण्यात आलीत. कुकी-जो संघटनेने महिलेच्या हत्येसाठी सुरक्षा दल आणि नागा सशस्त्र दलाला जबाबदार ठरवले आहे.
हिंसेनंतर कामजाँगच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिते (BNSS)च्या कलम 163 अंतर्गत आदेश जारी केलेत. त्याअंतर्गत पाच वा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव, ज्वलनशील व धोकादायक वस्तू बाळगणे, तसेच करफ्यू लावलेल्या ठिकाणी ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कांगपोकमी जिल्ह्यात शनिवारी एका वेगळ्या घटनेत संशयित माओवाद्यांनी टापोन आणि मकुई गावावर हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या मते, या हल्ल्यात नागा समुदायातील दोन ग्राम रक्षक एम. दैमाई आणि आर. गंगमेई यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख रिंगकांगमाईच्या रुपात झाली आहे.
नागा नागरिक संघटन वर्किंग कमेटी जेटीसी मणिपूरने दावा केला आहे की, 52 वर्षीय ग्रामिण अजिनबौ आर. यांचा शिर माओवाद्यांनी धडापासून वेगळे केले. संघटनेने त्यांच्या कुटुंबाला सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्यासाठी कापण्यात आलेला शिर पुन्हा देण्याची मागणी केली आहे.
इतर एका हल्ल्यात कामजाँग जिल्ह्याच्या भारत-म्यानमार सिमेजवळ स्थित तांगखुल नागा बहुल निंगचौ गावात संशयित माओवाद्यांनी गोळीबार केला. यात 35 वर्षीय नगाचांसो निंगशेन आणि 48 वर्षीय लेइशिशान लेइशादांगचा मृत्यू झाला आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल गावात पोहचले, तोपर्यंत हल्लेखोर माओवादी म्यानमारच्या दिशेने पळून जाण्यास यश झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
स्थानिक लोकांच्या मते, यंदाच्या वर्षी फेब्रुवारीत प्रभावित जिल्ह्यांमध्ये कुकी आणि नागा समुदायामध्ये झालेल्या हिंसाचारात 40 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. येथे अनेकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचार प्रामुख्याने उखरुल, कामजाँग, कांगपोकपी, तमेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यासह सेनापती जिल्ह्यातील काही भागात झाला होता.






