Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत रजिस्ट्रेशन का केलं नाही? मोहन भागवतांनी स्पष्टचं सांगितलं

सत्ताधारी भाजपची पालक संस्था असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक कार्यक्रम सुरू करणाऱ्या छत्र संघटनेचे नेतृत्व कोण करते. आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएस ही व्यक्तींची संस्था आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 09, 2025 | 02:49 PM
Mohan Bhagwat News:

Mohan Bhagwat News:

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत रजिस्ट्रेशन का केलं नाही
  • स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे कायदे नोंदणी अनिवार्य करत नाहीत
  • संघात येणाऱ्यांची जात किंवा धर्म पाहिला जात नाही

 

Mohan Bhagwat News: देशातील विरोधी पक्षांकडून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत आरएसएसचे रजिस्ट्रेशन का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावरून अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. पण आज एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएसच्या रजिस्ट्रेशन न करण्याचा प्रश्नावर उत्तर दिले आहे. कर्नाटकातील बंगळूर येथे आरएसएसच्या १०० वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत यांनी यावर भाष्य केलं आहे.

“तुम्हाला माहिती आहे की आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली होती.आम्ही ब्रिटिश सरकारकडे नोंदणीकृत व्हावे अशी आपली अपेक्षा आहे का? तेही ज्यांच्याविरुद्ध आम्ही काम करत होतो त्यांच्याकडे? असा सवाल भागवत यांनी उपस्थित केला. तसेच, स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे कायदे नोंदणी अनिवार्य करत नाहीत.

Gujrat Terror Activities: गुजरात ATSकडून मोठ्या दहशतावादी कटाचा पर्दाफाश; 3 संशयितांना अटक

मोहन भागवत म्हणाले की, नोंदणीकृत नसलेल्या संस्थांनाही कायदेशीर दर्जा देण्यात आली आहे. म्हणून आम्हाला या श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि एक संघटना म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आमच्यावर तीन वेळा बंदी घालण्यात आली होती, पण त्यानंतरही सरकारने आम्हाला मान्यता दिली.

न्यायालयांनी प्रत्येक वेळी बंदी उठवली

“जर आम्ही अस्तित्वात नसतो तर त्यांनी कोणावर बंदी घातली असती? प्रत्येक वेळी, न्यायालयांनी बंदी उठवली आणि आरएसएसला एक वैध संघटना म्हणून मान्यता दिली. संसदेत आणि इतरत्र अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले पण कायदेशीरदृष्ट्या, आम्ही एक संघटना आहोत, म्हणून आम्ही असंवैधानिक नाही.” अनेक गोष्टी नोंदणीकृत नाहीत. अगदी हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही. असंही भागवतांनी स्पष्ट केलं.

मोहन भागवत म्हणाले, सत्ताधारी भाजपची पालक संस्था असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक कार्यक्रम सुरू करणाऱ्या छत्र संघटनेचे नेतृत्व कोण करते. आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएस ही व्यक्तींची संस्था आहे आणि त्यांना करातून सूट दिली आहे.

Mohan Bhagwat News: हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे..; मोहन भागवतांचे सूचक विधान

मोहन भागवत यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, “जर आम्ही नसतो, तर त्यांनी कोणावर बंदी घातली असती?” सत्ताधारी भाजपची पालकसंस्था असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या या संघटनेचे नेतृत्व कोण करतो, हे सर्वांना ठाऊक आहे. आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएसला व्यक्तींची संस्था म्हणून मान्यता दिली असून, करमाफीही मंजूर केली आहे.

संघात येणाऱ्यांची जात किंवा धर्म पाहिला जात नाही

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मुस्लिमांना संघात सामील होण्याची परवानगी आहे का, असे विचारले असता भागवत म्हणाले, “ संघात येणाऱ्यांची जात किंवा धर्म पाहिला जात नाही. संघ कोणत्याही जाती, ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणून वेगळा प्रवेश देत नाही. संघात फक्त हिंदू समाजातील लोक येतात. संघात सामील होणारे लोक आपली वेगळी ओळख मागे सोडतात आणि एकच हिंदू समाज म्हणून कार्य करतात.”

 

 

 

Web Title: Mohan bhagwat news why has the rashtriya swayamsevak sangh not registered till date mohan bhagwat clearly explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 02:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.