हरियाणा: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वीच कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या प्रवेश मात्र भाजपसाठी रस्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत धक्का मानला जात आहे. मात्र, याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी काँग्रेसवर टीका केली आणि दोन्ही कुस्तीपटूंचे कौतुक केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे हरियाणाचे हिरे आहेत, ते देशाची शान आहेत आणि त्यांनी भारताचे नाव उंचावले आहे. मात्र काँग्रेस राजकारण करत आहे. हे दुर्दैवी आहे. आज भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणतात की, त्यांच्याकडे आमदार असते तर त्यांना राज्यसभेवर पाठवले असते. या खेळाडूंनी पदके जिंकली तेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी काही का केले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेदेखील वाचा: लॉंचिंगपूर्वी Kia कडून carnival चा टिझर प्रदर्शित, सनरुफ ठरतंय प्रमुख वैशिष्ट्य
काँग्रेसवर निशाणा साधत नायब सिंग सैनी म्हणाले, “काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयावर राजकारण करते, मग ते सीएए असो किंवा शेतकऱ्यांचे आंदोलन. पण त्यांनीही काहीतरी चांगले काम केले असेल. तुम्ही काही चांगले केले असेल. काँग्रेस कार्यकाळात मंत्री किंवा आमदाराच्या घरी चकरा मारून नोकरी मिळेल असे तरुणांना वाटायचे, पण आता भाजप सरकारच्या काळात कोचिंग क्लास आणि अभ्यास करून सरकारमध्ये नोकरी मिळेल, हे तरूणांना माहित आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी भविष्यवाणी केली आहे. नायब सिंग सैनी यांनी राज्यात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर पुढे जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मुगाच्या डाळीचा कुरकुरीत डोसा