नुकत्याचं वर्ल्ड अॅथेलिटीक्स स्पर्धेत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला होता. त्याच्या या विजयानंतर भारतवासीयांच्या त्याच्या कडून अपेक्षा वाढल्या होत्या मात्र आता या अपेक्षांवर पाणी फेरल्याचं दिसून येत आहे. दुखापतीमुळं नीरज बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 28 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत गोल्डन बॅाय नीरज चोप्रा भाग घेणार होता. मात्र, आता तो या स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी याबाबत माहिती दिली.
[read_also content=”‘या’ पदार्थामुळे वाढू शकते डोकेदुखी! जाणून घ्या नक्की कोणते पदार्थ आहेत… https://www.navarashtra.com/lifestyle/substance-can-increase-headache-knowing-exactly-which-foods-are-nrrd-308219.html”]
भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.
[read_also content=”गळफास घेण्यासाठी शेतकरी घुसले वन कार्यालयात https://www.navarashtra.com/lifestyle/substance-can-increase-headache-knowing-exactly-which-foods-are-nrrd-308219.html”]