Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामलीला मैदानात आंदोलनासाठी आता नवे निर्बंध; एका सभेला केवळ 50000 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा

कोणत्याही कार्यक्रमात ५० हजारांपेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही. मात्र, प्रत्यक्षात किती लोकांना परवानगी द्यायची, याचा निर्णय संबंधित सक्षम अधिकारी घेणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 15, 2026 | 09:46 AM
रामलीला मैदानात आंदोलनासाठी आता नवे निर्बंध; एका सभेला केवळ 50000 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा

रामलीला मैदानात आंदोलनासाठी आता नवे निर्बंध; एका सभेला केवळ 50000 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील रामलीला मैदानावर धरणे, आंदोलने, रॅली आणि जाहीरसभा आयोजित करण्यासाठी नवे निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव.
  • दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमांचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती (SOP) तयार.
  • या SOP चा मसुदा मंजुरीसाठी पोलीस मुख्यालयाकडे पाठवण्यात आला.

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर धरणे, आंदोलने, रॅली आणि जाहीरसभा आयोजित करणे आता अधिक नियमांच्या चौकटीत येण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमांचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती तयार केली असून, तिचा मसुदा मंजुरीसाठी पोलीस मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

या प्रस्तावानुसार, रामलीला मैदानावरील एका कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त ५० हजार लोकांनाच परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आंदोलन आणि जाहीर सभा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच घेता येणार आहेत. कोणत्याही कार्यक्रमात ५० हजारांपेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही. मात्र, प्रत्यक्षात किती लोकांना परवानगी द्यायची, याचा निर्णय संबंधित सक्षम अधिकारी घेणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप, अपेक्षित गर्दी आणि उपलब्ध सुरक्षा व्यवस्था यांचा विचार करून ही मर्यादा निश्चित केली जाईल. आयोजकांना कार्यक्रमाच्या तारखेच्या किमान १० दिवस आधी परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

वाहतूक, पार्किंग जबाबदारी आयोजकांवर

कार्यक्रमादरम्यान गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांवर असेल. यासाठी त्यांना पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नियोजन करावे लागेल. तसेच, वाहनांमधून येणाऱ्या लोकांसाठी निश्चित उतरवण्याची ठिकाणे तयार करावी लागतील, रस्ते, पदपथ आणि आपत्कालीन मागाँवर अडथळे निर्माण होणार नाहीत, याची खबरदारीही आयोजकांना घ्यावी लागणार आहे.

शस्त्रे आणि प्रतिबंधित वस्तूंवर बंदी

सुरक्षेच्या दृष्टीने मैदानात शस्त्रे, तलवारी, भाले, धारदार वस्तू आणि कायद्याने प्रतिबंधित असलेल्या साहित्याला परवानगी दिली जाणार नाही. मैदानाच्या परिसरात ड्रोन उडवण्यासाठीही पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल. याशिवाय पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, स्वच्छता, शौचालये आणि कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये जंतर-मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आंदोलने आणि रॅलींसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान अशी तीन पर्यायी ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.

रामलीला मैदानासाठी स्वतंत्र SOP

आता रामलीला मैदानावरील कार्यक्रमांसाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आली आहे. या मसुद्याला पोलीस मुख्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आणि सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतरच नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामुळे राजधानीतील आंदोलन आणि राजकीय सभांच्या आयोजनावर अधिक शिस्त व नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

FAQ

1. रामलीला मैदानावरील कार्यक्रमांसाठी नवे निर्बंध कोणी तयार केले आहेत?

दिल्ली पोलिसांनी नवीन मानक कार्यपद्धती (SOP) तयार केली आहे.

2. एका कार्यक्रमासाठी किती लोकांना उपस्थित राहण्याची मर्यादा प्रस्तावित आहे?

एका कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त ५० हजार लोकांची मर्यादा प्रस्तावित आहे.

3. रामलीला मैदानावर आंदोलन आणि सभा कोणत्या वेळेत घेता येणार आहेत?

सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यक्रम घेता येणार आहेत.

Web Title: New restrictions now in place for protests at ramlila maidan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.