देशावरचं कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसताना आता मंकीपॅाक्सचं सकंट घोंगावत आहे. मात्र, असं असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आलं आहे. ट्रांसएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटी पीसीआर किट (Monkeypox RT-PCR) अतिशय संवेदनशील असून हाताळायला फार सोपं आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा अहवाल लवकर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यास मदत होणार आहे.
[read_also content=”इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर https://www.navarashtra.com/sports/indian-womens-cricket-team-announced-for-england-tour-317924.html”]
केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सुद यांच्या हस्ते पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट लाँच करण्यात आलं आहे. ट्रांसएशिया एर्बा मेडिकल्स (Transasia Biomedicals)या फार्मा कंपनीनं हे मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट (RT-PCR) तयार केलं आहे.
देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
[read_also content=”इकडे रचत होते थरावर थर तिकडे गोंविदाला मृत्युने कवटाळले! https://www.navarashtra.com/maharashtra/govinda-dies-while-dancing-during-dahi-handi-nrps-317892.html”]