नवी दिल्ली – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले. नुपूर शर्मा यांनी टीव्हीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असे निर्देश दिले. नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्यावर विविध राज्यांत दाखल झालेले सर्व गुन्हे दिल्लीला वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
यावर सुनावणी करताना टीव्हीवरुन देशाची माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. नुपूर शर्मावर दिल्ली, कोलकाता, बिहारपासून पुण्यापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या याचिकेत नुपूरने म्हटले होते की, तिला सतत वेगवेगळ्या राज्यातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
नुपूर शर्माची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, नुपूर यांनी विधानाबद्दल माफी मागितली आहे आणि ते मागे घेतले आहे. त्यावर कोर्ट म्हणाले- त्यांनी टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागायला हवी होती. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.