
नवी दिल्ली – ओडिशाच्या नयागडमध्ये शनिवारी पहाटे तेलाच्या टँकरचा स्फोट होऊन चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. बॅरिकेड्सवर आदळल्यानंतर तेलाचा टँकर एका छोट्या नदीत पडला आणि नंतर त्याचा स्फोट झाला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकज नायक, बिभू खटुआ, समीर नायक आणि चंदन खटुआ अशी मृतांची नावे आहेत.