आपल्या देशात शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. देशाचे पोषण करण्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देखील दिली जाते. 23 डिसेंबर हा किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या किसानदिनाकरिता अवघा एक दिवस राहिला आहे त्यामुळेच आज आम्ही घेऊन आलो आहोत भारतातील पाच शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी गाथा. ज्यांच्या उल्लेखनीय जीवनप्रवासांमधून समकालीन कृषीचे यशस्वी उद्योजकतेमधील परिवर्तन दिसून येते. त्यांच्या गाथांमधून स्थिरता, नाविन्यता व सामुदायिक पाठिंब्याची ताकद निदर्शनास येते, तसेच निदर्शनास येते की योग्य टूल्स व माहितीसह शेतकऱ्यांचे सक्षमीकरण विकसित भारतसाठी मार्ग सुकर करण्यास मदत करत आहे.
1. चेन्ना रेड्डी
एकेकाळी बेंगळुरूमध्ये प्लंबर असलेले चेन्ना रेड्डी आंध्र प्रदेशातील जंगलापल्ली गावात आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर परतले, जिथे पाण्याच्या कमतरतेमुळे जमिन नापीक झाली होती. आनंदन – कोका-कोला इंडिया फाऊंडेशनच्या प्रोजेक्ट उन्नती मँगोच्या माध्यमातून त्यांनी अल्ट्रा हाय-डेन्सिटी प्लांटिंग (यूएचडीपी) आणि ठिबक सिंचन यांसारखी आधुनिक तंत्रे शिकून घेतली.
या प्रगत पद्धतींमुळे फळांचे उत्पादन व गुणवत्ता तर वाढलीच पण खते आणि कीटकनाशकांची गरजही कमी झाली. क्लायमेट-स्मार्ट शेती आणि पीक व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासह, चेन्ना यांनी त्यांच्या नापीक जमिनीवर भरभराटीने आंब्याच्या बागा तयार केल्या. यामधून दाखवून दिले की शाश्वत कृषीपद्धती अगदी नापीक जमिनींनाही पुनरुज्जीवित करू शकतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या वारशाशी जोडू शकतात.
2. तुलाबती बदनायक
इको-टूरिझमसह कॉफी फार्मिंगचे मिश्रण: ओडिशातील कोरापुट या आदिवासी गावात कॉफी फार्मरपासून इको-टूरिझमपर्यंत, तुलाबती बदनायक यांनी स्थिरता आणि नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून स्वत:चे जीवन व समुदायामध्ये बदल घडवून आणला आहे. कॉफी शेतकरी म्हणून स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी प्रोजेक्ट उन्नती कॉफी अंतर्गत शाश्वत पद्धतींचा अवलंब केला, जसे निवडक कापणी आणि उन्हात वाळवणे. या तंत्रांनी त्यांच्या कॉफीची गुणवत्ता सुधारली, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत झाली.
शेती व्यतिरिक्त तुलाबती यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी गावाच्या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेऊन पर्यावरण पर्यटन उपक्रम सुरू केला. आज, त्या स्वत:च्या कुटुंबाला आधार देण्यासोबत आपले ज्ञान वाटून देत आणि सामूहिक वाढीस चालना देऊन इतर महिलांना सक्षम करत आहेत.
3. जे. सी. पुणेथा
माजी कापड अभियंता जे. सी. पुणेथा वयाच्या ७०व्या वर्षी अहमदाबादमधील संपन्न औद्योगिक कारकीर्दीनंतर उत्तराखंडमधील चंपावत येथील सफरचंद शेतीकडे वळले. पुन्हा निसर्गाशी संलग्न होण्याची इच्छा आणि स्वत:च्या जमिनीचा उत्पादनक्षम वापर करण्यामधून प्रेरणा घेत त्यांनी हा निर्णय घेतला.
प्रोजेक्ट उन्नती अॅप्पलच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोपांची लागवड केली आणि ठिबक सिंचन यंत्रणा राबवली. सुरुवातीच्या आव्हानांना न जुमानता आणि अहमदाबादमधील आपल्या कुटुंबापासून दूर राहत शेतीचे व्यवस्थापन करत असतानाही पुणेथा यांनी उल्लेखनीय यश गाठले. त्यांचे लक्ष आता त्याच्या बागेचा विस्तार करण्यावर आणि सहकारी शेतकऱ्यांना शाश्वत पद्धती अवलंबण्यात मदत करण्यावर आहे, जेथे त्यांना सिद्ध करायचे आहे की, नाविन्यता आणि चिकाटीने उल्लेखनीय परिणाम मिळू शकतात.
4. गीता महेश्वरी
तामिळनाडूमधील थेनी येथील समर्पित शेतकरी गीता महेश्वरी गेल्या एक दशकाहून अधिक काळ जमिनीची लागवड करत आहेत. काही वर्षांपूर्वी, ज्यांनी प्रोजेक्ट उन्नती ग्रेप्स आणि सेन्डेक्ट केव्हीके (CENDECT KVK) अंतर्गत प्रशिक्षण उपक्रमात प्रवेश घेतला, जेथे त्यांनी कीटक व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा वापर यासह प्रगत शेती तंत्र अवगत केले. यामुळे त्यांना स्वत:चे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत झाली, तसेच लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
शेतीव्यतिरिक्त, गीता यांनी केव्हीके सेन्डेक्टच्या अनुदान योजनेचा लाभ घेत आपल्या चिन्नावलापुरम गावात लग्नाचा हॉल पीएसपी महल सुरू केला. हा हॉल वंचित कुटुंबांना परवडणाऱ्या दरात सेवा पुरवतो आणि लग्न सोहळ्याचा आर्थिक भार हलका करतो. गीता यांच्या प्रवासामधून त्यांचा वैयक्तिक विकास, तसेच त्यांच्या समुदायाला सक्षम करण्याप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते.
5. खिलानंद जोशी
वयाच्या ७५व्या वर्षी, सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर खिलानंद जोशी आपल्या कुटुंबाचा शेतीचा वारसा पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीकोनासह उत्तराखंडमधील चंपावत येथील आपल्या गावी परतले. शाश्वत शेतीचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही त्यांनी प्रोजेक्ट उन्नती अॅप्पलअंतर्गत सफरचंद शेतीला सुरूवात केली.
अल्ट्रा-हाय-डेन्सिटी वृक्षारोपण तंत्र आणि ठिबक सिंचनाच्या साहाय्याने खिलानंद यांनी आपल्या शेताला वैविध्यपूर्ण कृषी केंद्रात बदलले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरफचंदाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली, तसेच त्यांच्या समुदायाला आधुनिक कृषीपद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा देखील मिळाली. दहा कामगारांना रोजगार देण्यासह त्यांनी रोजगार व ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची स्थानिक परिसंस्था निर्माण केली आहे. खिलानंद यांच्या उशिरा, पण प्रभावी शुभारंभामधून दिसून येते की जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर निर्धार व नाविन्यतेसह कृषीमध्ये यश मिळू शकते.