उपराष्ट्रपतीसाठी संघाचा दबाव
Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२३ जुलै) तिसरा दिवसही वादळीच ठरला. आजही संसदेत विरोधी इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपमध्ये वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. पहिल्या दोन दिवसांत, विरोधक आणि सरकारमधील संघर्षामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू शकले नाही. तर तिसऱ्या दिवसाची सुरूवातही चांगलीच वादळी झाली. बिहारच्या एसआयआर मोहिमेबाबत विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा संसदेच्या आवारात निदर्शने केली. यावेळी राहुल गांधींपासून ते समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादवपर्यंत सर्वजण काळ्या कपड्यांमध्ये या मोहिमेविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसले.
बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) विरोधात काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी आज लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. केंद्रातील मोदी सरकार दलित, मागासलेले आणि अल्पसंख्याक समुदायांना मतदार यादीतून पद्धतशीरपणे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा त्यांनी आरोप केला.
बिहारमधील गरीब, दलित आणि मागासवर्गीयांचे मतदानाचे हक्क हिरावून घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत माणिकम टागोर यांनी केला. संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनुवादी मानसिकतेखाली मोदी सरकारने लाखो गरीब लोकांना मतदार यादीतून काढून टाकल्याचा आरोप करत यावर तातडीने चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली.
त्यानंतर राज्यसभा सदस्य रेणुका चौधरी यांनीदेखील आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडला. ज्यामध्ये बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) आणि लोकशाही हक्कांच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. राज्यसभेतील खासदार अखिलेश प्रसाद सिंह, सय्यद नसीर हुसेन, राणी अशोकराव पाटील आणि रणजित रंजन यांनीही स्थगन प्रस्ताव दिला आहे. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या मुद्द्यावर त्वरित चर्चा करण्याची मागणी या तिन्ही खासदारांनी केली आहे.
सीपीआय खासदार पी. संधोष कुमार यांनीही बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (एसआयआर) वर चर्चा करण्याची मागणी केली. त्यांनी संसदीय नियमांच्या नियम २६७ अंतर्गत राज्यसभेतील कामकाज तहकूब करण्याची सूचना दिली आहे.
Himesh Reshammiya Birthday: गायकाला संगीत क्षेत्रात बनवायचे नव्हते करिअर? वाढदिवशी जाणून घेऊयात
दिल्लीतील जबरदस्तीने करण्यात आलेल्या बेदखलीमुळे उद्भवलेल्या गंभीर मानवीय संकटावर राज्यसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. त्यांनी राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत स्थगन सूचना देत संसदेत तत्काळ चर्चा घेण्याची मागणी केली. दिल्लीतील अनेक झोपडपट्टी भागांमधून नागरिकांना जबरदस्तीने हटवले जात असल्याचे आरोप असून त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय सिंह यांनी हे प्रकरण संसदेत उपस्थित केले आहे.