parliament
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची (Parliament Monsoon Session) तारीख जाहीर झाली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाची (Monsoon Session News) सुरुवात १८ जुलैला होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन (Session In Delhi) सुरु राहणार आहे. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची माहिती दिली आहे.
[read_also content=”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का?; किरीट सोमय्या म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/is-deputy-chief-minister-devendra-fadnavis-upset-kirit-somaiya-said-nrdm-299478.html”]
देशातील महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ या मुद्द्यांसोबतच अग्निपथ योजनेबाबतही या अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी अधिवेशनात गदारोळ घातला होता.
लोकसभा सचिवालायाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडेल. राष्ट्रपती निवडणुकीनंतर ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होईल. त्यानंतर ११ ऑगस्टला उपराष्ट्रपती शपथ घेतील.