Terrorist arrested in Andhra Pradesh : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या कऱण्याच्या कटात सहभागी असलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2011 साली तामिळनाडूतील मदुराई येथे रथयात्रेदरम्यान अडवाणींना लक्ष्य करून पाईप बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता या कटात सहभागी असलेल्या दहशतवाद्याला सुमारे 15 वर्षांनी आंध्र प्रदेशात अटक करण्यात आली आहे. अबुबकर सिद्धीकी असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यासोबत आणखी एक फरार मोहम्मद अली उर्फ युनूस उर्फ मन्सूरलाही अटक करण्यात आली आहे.
हे दोन्ही दहशतवादी जवळजवळ तीन दशकांपासून तामिळनाडू पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होते आणि देशाच्या दक्षिणेकडील भागात अनेक गंभीर बॉम्बस्फोटांमध्ये त्यांचा सहभाग होता. गुप्त माहिती आणि तांत्रिक देखरेखीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातून अटक केली. मंगळवारी पोलिसांनी दहशतवाद्याच्या अटकेची माहिती दिली. अबुबकर सिद्दीकीला आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातील त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून तामिळनाडू दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. दोघांनाही गुप्त माहितीच्या आधारे आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने अटक करण्यात आली.
कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय दहशतवादी अबुबकर सिद्दीकी हा दक्षिण भारतात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी होता. पोलीस गेल्या ३ दशकांपासून म्हणजेच सुमारे ३० वर्षांपासून दहशतवाद्यांचा शोध घेत होते. दहशतवादी अबुबकरवर पोलिसांनी ५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अबुबकर अनेक बॉम्बस्फोट आणि सांप्रदायिक हत्याकांडात सहभागी होता आणि तीन दशकांहून अधिक काळापासून पोलिस त्यांच्या शोधात होते.
बॉम्ब बनवणारा तज्ञ आणि कट्टरपंथी विचारसरणीचा सिद्दीकी १९९५ पासून फरार होता आणि त्याच्या डोक्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो तामिळनाडू आणि शेजारील राज्यांमध्ये घडलेल्या अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी घटनांचा मास्टरमाइंड असल्याचे मानले जाते. बिलाल मलिक, ‘पोलिस’ फकरुद्दीन आणि पन्ना इस्माईल यांच्यासह अनेक प्रमुख कट्टरपंथी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात त्यांनी मध्यवर्ती भूमिका बजावली.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ;
माहितीनुसार, दहशतवादी अबुबकर १९९५ मध्ये चिंताद्रिपेट येथील हिंदू मुन्नानीच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटात, १९९५ मध्ये हिंदू उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यां टी. मुथुकृष्णन यांना लक्ष्य करून केलेल्या पार्सल बॉम्बस्फोटात, १९९५ मध्ये एग्मोर येथील चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटात आणि तिरुचिरापल्ली, कोइम्बतूर आणि केरळसह इतर सहा ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी आहे. २०११ मध्ये तामिळनाडूतील मदुराई येथे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेदरम्यान त्यांना लक्ष्य करण्यासाठी पाईप बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करण्यात या दहशतवादीचा सहभाग होता.