चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर...
OpenAI च्या मालकीचे असलेले AI चॅटबोट चॅटजीपीटी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येकजण आपल्या कामासाठी दिवसातून 10 वेळा चॅटजीपीटीचा वापर करतो. चॅटजीपीटीवर आपण वेगवेगळ्या विषावरील माहिती अगदी सहजपणे सर्च करू शकतो. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅटजीपीटी अनेक भाषांना सपोर्ट करतो. त्यामुळे तुम्हाला ज्या भाषेत माहिती पाहिजे असेल तुम्ही शोधू शकता. युजर्स चॅटजीपीटीने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात. पण आता चॅटजीपीटीची मालक असलेली कंपनी OpenAI च्या सीईओ सॅम ऑल्टमॅनने असं विधान केलं आहे, ज्यामुळे युजर्समध्ये खळबळ उडाली आहे.
Vi ने लाँच केला नवीन गॅरंटी प्रोग्राम, या ग्राहकांना मिळणार अॅडिशनल व्हॅलिडीटी
OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅनने ChatGPT बाबत पुन्हा काही असं विधान केलं आहे यूजर्स हैराण झाले आहेत. खरं तर एका पॉडकास्टदरम्यान त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, लोकं AI टूलवर प्रचंड विश्वास ठेवत आहेत. मात्र हे AI टूलवर एवढा विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. यासोबतच पॉडकास्टमध्ये त्यांनी असं देखील सांगितलं की, ChatGPT मध्ये अनेक उत्तम गोष्टी आहेत, मात्र त्यातून देखील काही चूका होऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
एक पॉडकास्टमध्ये टेक्नोलॉजिस्ट एंड्रयू मेनसोबत सुरु असलेल्या संभाषणादरम्यान, ऑल्टमॅनने सांगितलं की, लोकं ChatGPT वर जास्त विश्वास ठेवत आहेत. मात्र AI भ्रम निर्माण करतो. हे एक असं AI टूल आहे, ज्यावर जास्त विश्वास ठेवणं योग्य नाही. ऑल्टमॅनने असं देखील म्हटलं आहे की, मोठ्या लँग्वेज मॉडल्सची एक कमजोरी अशी आहे की, ते कधीकधी तथ्यात्मक चुका करतात. ऑल्टमन यांनी असेही म्हटले आहे की यूजर्सनी चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच काळजी कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरताना घेतली पाहिजे.
ऑल्टमॅनने केलेल्या या विधानानंतर आता युजर्समध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. चॅटजीपीटीने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही, याबाबत युजर्समध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सॅम ऑल्टमॅनने असं देखील सांगितलं आहे की, OpenAI ChatGPT मध्ये मोनेटाइजेशन मॉडल्ससारखे ट्रांजेक्शन फीस किंवा लिमिटेड एड्स आणण्याबाबत विचार केला जात आहे. परंतु जर कंपनीने पैसे कमविण्यासाठी एलएलएमचे निकाल बदलण्यास सुरुवात केली तर ते विश्वास तोडण्याचा क्षण असेल. ऑल्टमन म्हणाले, मी स्वतः एक यूजर म्हणून हे कधीही सहन करणार नाही.
यापूर्वी Altman ने स्वीकारले होते की GPT-4o अपडेटनंतर, ChatGPT आवश्यकतेपेक्षा अधिक चाकोरीबाज आणि त्रासदायक बनले आहे. खरं तर, या अपडेटमध्ये, AI ची इंटेलिजेंस आणि व्यक्तिमत्व आणखी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु परिणाम असा आहे की ChatGPT ने प्रत्येक गोष्टीला ‘हो’ असे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युजर्स प्रचंड वैतागले आहेत.