Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोणतीही कसर सोडू नका..’, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी दहशतवादविरोधी क्षमतांचा संपूर्ण स्पेक्ट्रम तैनात करण्याचे दिले निर्देश दिली आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 13, 2024 | 06:02 PM
‘कोणतीही कसर सोडू नका..’, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकाऱ्यांचा ही समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. गेल्या चार दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी चार ठिकाणी हल्ले केले असून त्यात नऊ यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान ठार झाला आहे. सात सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जण जखमी झाले. गुरुवारच्या बैठकीत पंतप्रधानांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यांना दहशतवादविरोधी प्रयत्नांची माहितीही देण्यात आली.

या बैठकीदरम्यान मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारताची दहशतवादविरोधी क्षमता पूर्णपणे तैनात करण्याचे आवाहन केले. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुरक्षा दलांची तैनाती आणि दहशतवादविरोधी कारवायांबाबतही चर्चा केली. कठुआमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवादीही ठार झाले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लष्कर, पोलिस आणि निमलष्करी दलांनी डोडा जिल्ह्यातील कोटा टॉप, चट्टागल्ला आणि आसपासच्या भागात शोध मोहीम पुन्हा सुरू केली. जिथे मंगळवार आणि बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन पोलिसांसह सात जण मारले गेले कर्मचारी जखमी झाले.

पोलिसांनी रेखाचित्र प्रसिद्ध केले

दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे पोलिसांनी रेखाचित्रद्वारे प्रसिद्ध केली आणि त्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याआधी रविवारी, रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याला पोलिसांनी 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते आणि त्याचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले होते. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत.

रियासी आणि राजौरी जिल्ह्यात शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांच्या स्केचशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला दुपारी रियासी येथील बसमधून ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेण्यात आले. ते म्हणाले की, राजौरीच्या नौशेरा आणि नजीकच्या पुंछमध्येही शोधमोहीम राबवली जात आहे. कठुआ, सांबा आणि जम्मू जिल्ह्यातही दहशतवादी धोक्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे.

कठुआमध्ये मंगळवारी रात्री सुरू झालेल्या आणि 15 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईत सीआरपीएफचा एक जवानही शहीद झाला, तर एक नागरिक जखमी झाला. पोलिसांनी बुधवारी एक ॲडव्हायझरी जारी करून जम्मू प्रदेशातील रहिवाशांना संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. राजौरी आणि जम्मू जिल्ह्यांतील काही भागांमध्ये दहशतवादी धोक्याची शक्यता दर्शविणाऱ्या गुप्तचर माहितीनंतर ही सूचना जारी करण्यात आली.

Web Title: Pm asks officials to deploy full spectrum of counter terror measures in jammu and kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2024 | 06:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.