PM Narendra Modi and President Draupadi Murmu special Republic Day greetings
नवी दिल्ली : देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. राजधानी दिल्लीमध्ये पहाटेपासून मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करतील त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन देशातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, “तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या प्रसंगी, आपण त्या सर्व महान व्यक्तींना आदरांजली वाहतो ज्यांनी आपले संविधान तयार करून, आपला विकास प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकतेवर आधारित असल्याचे सुनिश्चित केले. मला आशा आहे की हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाच्या मूल्यांचे जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी बळकटी देईल,” अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन देखील देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर इंडोनेशियाचे प्रमुख प्रबोवो सुबियांतो यांचे राजभवनमध्ये स्वागत केले.मद्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की,” राष्ट्रपती भवनात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती सुबियांतो यांचे आभार मानले. ७५ वर्षांपूर्वी १९५० मध्ये आपल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे होते याची आठवण त्यांनी करून दिली. हे भारत आणि इंडोनेशियामधील दीर्घकालीन संबंध आणि मजबूत लोकशाही परंपरेचे प्रतिबिंब आहे,” असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजनाथ सिंग यांनी लिहिले आहे की, ७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त भारतातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि आपल्या संविधानात समाविष्ट असलेल्या विचारांचा आणि मूल्यांचा आदर करण्याचा हा एक प्रसंग आहे. आपल्या देशाच्या सतत प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.