File Photo : Ladki Bahin Yojana
मुंबई: महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. पण या सर्व अफवांना खोडून काढत राज्य सरकारने लाभार्थी महिलांना योजनेचा सातवा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम 26 जानेवारीपूर्वी दिली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २४ जानेवारीपासूनच महिलांच्या खात्यात पैसे देण्यास सुरुवात झाल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. पहिल्या दिवशी, म्हणजे गुरुवारी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी 10 लाख महिलांना पैसे देण्यात आले आहेत आणि 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा केली जाईल.
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजना गेम चेंजर ठरली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला होता. पण निवडणुकीनंतर महिलांच्या पात्रतेची पुर्नतपासणी आणि अपात्र महिलांकडून व्याजासह योजनेअंतर्गत दिलेले पैसे परत घेण्याबाबत चर्चा सुरू झाली. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे हजारो महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले आहेत. चौकशी आणि कारवाईच्या अफवांमध्ये, सरकारने लाभार्थी महिलांना सातव्या हप्त्याचे पैसे जमा केल्याने महिलांवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.
धक्कादायक! गुलियन बॅरी सिंड्रोममुळे सोलापूरच्या तरूणाचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास खात्यासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यानुसार, 26 जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, 24 जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र महिलांना आपले आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते त्वरित तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या निराशाजनक कामगिरीमुळे, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यातून बाहेर काढण्यात येईल असा दावा केला जात होता. परंतु महायुती सरकारने जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा सत्तेत परतले आहे. जुलै ते जानेवारी या सात महिन्यांत सरकारने आतापर्यंत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दराने सुमारे 10500 रुपये दिले आहेत.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने बहिणींना आश्वासन दिले होते की जर राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आली तर योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये केली जाईल. तथापि, नोव्हेंबरमध्ये निवडणुका जिंकून पुन्हा सत्तेत येऊनही, सरकार लाभार्थी महिलांना फक्त 1500 रुपये देत आहे. या संदर्भात, मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच सांगितले आहे की, मार्च 2025 मध्ये सादर होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पादरम्यान, सरकार योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.