उदयपूर – उदयपूर हत्याकांड प्रकरणी चिघळत असून राजस्थानसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी पसार होताना पोलिसांनी १३ किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
उदयपूर येथील शिंपी कन्हैयालाल यांचा हत्या करण्याऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी राजसमंद येथून पकडले आहे. हे दोन्ही गुन्हेगार हे भ्याड कृत्य करून मोटारसायकलवरून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत तब्बल १३ किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतलं.
उदयपूर हत्याकांडाच्या तपासासाठी आज एनआयएची 7 ते 10 सदस्यीय टीम उदयपूर दाखल झाली आहे. या टीममध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश आहे. शवागाराबाहेर एसआयटीही आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उदयपूरमधील टेलरचा मालक कन्हैया लाल साहू याने सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली होती. यानंतर दोन तरुण त्याला सतत धमक्या देत होते. गेल्या दिवसांपासून या तरुणाने दुकानही उघडले नव्हते, मात्र मंगळवारी दुकान उघडले असता कपडे शिवण्याच्या नावावर दोन जण दुकानात आले. कपड्यांचे मोजमाप करत असताना युवकांनी त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. हत्येनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. कोणतीही अनपेक्षित घटना टाळण्यासाठी संपूर्ण राजस्थानमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कलम 144 लागू करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया एमबी हॉस्पिटलबाहेर उपस्थित आहेत. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.