odisha rail accident
कटक : ओडिशाच्या बालासोर येथील तीन ट्रेनच्या अपघातात (Balasore Railway Accident) 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात अनेकांच्या डोक्याला, पायाला जबर मार लागला. अनेक लोक या अपघातातून आता बरेही होत आहेत. या अपघातातील काही प्रवाशांना मानसिक आजारांनी (Mental Shock) घेरले आहे. अनेकजण हसत आहेत. काही सारखे रडत आहेत. तर कोणी वारंवार ओरडते तर कोणी शांत बसून आहे. अशी विचित्र परिस्थिती या प्रवाशांची झाली असून, या प्रवाशांवर युद्धपातळीवर उपचार केले जात आहे. कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये 105 रुग्णांना दाखल करण्यात आले होते.
डोक्यावर गंभीर परिणाम
एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. क्लिनिकल सायकॉलॉजी विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. जशोबंता महापात्रा यांनी या वृत्तसंस्थेला या आजाराबाबतची माहिती दिली आहे. अपघातातील सर्व रुग्णांची मानसिक स्थिती पाहिली असता सर्व रुग्णांचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. या रेल्वेमध्ये असलेल्या लोकांच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तसे होणे स्वाभाविक आहे, असे महापात्रा यांनी सांगितले.
अनेक रुग्ण तणावात
काही रुग्ण प्रचंड तणावात दिसत आहेत. काही प्रचंड घाबरलेले आहेत. काही रुग्ण कधी कधी घाबताना दिसत आहेत. काही जखमींवर इतका परिणाम झाला की, ते मौनात गेले आहेत. काहीही या सर्वांनी पत्रात रेल्वे बोलण्यास तयार नाहीत. आम्ही अशा सर्वांचे समुपदेशन करत रुळालगतची अवैध अतिक्रमणे आहोत. आम्ही या रुग्णांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधत आहोत.
बहनगा स्थानक बंद, लॉग बुक जप्त
या अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतली आहे. पुढील आदेशापर्यंत बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही रेल्वेगाडी थांबणार नाही. सीबीआयने हे स्थानक आपल्या ताब्यात घेऊन येथील ‘लॉग बुक’ आणि उपकरणे तपासासाठी जप्त केली आहेत. दक्षिण- पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्यकुमार चौधरी यांनी सांगितले की, सीबीआयने ‘लॉग बुक’, ‘रिले पॅनेल’ आणि इतर उपकरणे जप्त केल्यानंतर स्टेशन ‘सील’ केले.
पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात तोडफोडीपासून सर्व बाबीची चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींना पत्रे लिहिणाऱ्या बहुतांश आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा घटना रोखण्यासाठी योग्य सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला आहे.