
पंजाबमधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील जालंधर येथे एका पोलीस उपअधीक्षकाचा मृतदेह आढळुन (DSP shot dead In Punjab) आला आहे. दलबीर सिंग देओल असं त्याचं नाव असुन ते जालंधरमधील संगरूरमध्ये तैनात होते. त्यांचा मृतदेह सोमवारी बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला.या घटनेनं पंजाब पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणी तपास करत आहेत.
[read_also content=”नोबेल शांतता पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी, सहा महिने तुरुंगवास! https://www.navarashtra.com/world/nobel-peace-laureate-muhammad-yunus-convicted-for-violating-bangladesh-labour-laws-nrps-494277.html”]
एडीसीपी बलविंदर सिंग रंधावा यांनी सांगितले की, आम्हाला कोणीतरी फोन करून बस्ती बावा खेलजवळ कोणाचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. आमचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेह डीएसपी दलबीरचा असल्याचे आढळून आले. जे संगरूर येथे तैनात होते. त्याच्या डोक्यालाही जखम झाली होती. पंजाब पोलीस सुरुवातीला हा रस्ता अपघात मानत होते पण पोस्टमॉर्टममध्ये डीएसपीच्या गळ्यात गोळी अडकल्याचे आढळून आले. घटनेनंतर डीएसपीचे सर्व्हिस पिस्तूलही गायब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसापुर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीरचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला. डीएसपीच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री न्यू इयर पार्टीनंतर तो डीएसपीला बस स्टँडच्या मागे सोडले होते. घटनेच्या वेळी डीएसपींसोबत त्यांचे रक्षक उपस्थित नव्हते. पंजाब पोलीस बसस्थानकाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. याप्रकरणी डीएसपीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. जेणेकरून डीएसपीच्या मृत्यूशी संबंधित कोणताही सुगावा मिळू शकेल.
मृत डीएसपीचा भाऊ रणजीत सिंह यांनी सांगितले की, दलबीरचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हे खुनाचे प्रकरण असल्याचे समजते. पोलीस त्याचा तपास करत आहेत. दलबीर सिंग हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.